नवी दिल्ली : भारतीय टीमने (Team India) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडीयमवर इंग्लडविरुद्ध (India Vs England) पाच मॅचच्या टी 20 सिरीजमधील दुसरा सामना जिंकला. इंग्लंडला ८ विकेट्सनी हरवताना टीम इंडीयाने दुसऱ्या मॅचसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले होते. यातून ओपनिंग बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhavan) आणि स्पिन ऑलराऊंडर अक्षर पटेल  (Akshar Patel) यांना बाहेरचा रस्ता दाखवत याजागी इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांना संधी दिली होती. यानंतर हे स्पष्ट झालं की मुंबई इंडियन्स पुढच्या वर्षी सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना रिटेन करु शकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्याबरोबरच ते आता भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झाले. किशनने 56 रन्सची शानदार खेळी केली. तर सूर्यकुमारला खेळ दाखवण्याची संधी मिळाली नाही. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी डेब्यु केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढच्या वर्षी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनसुद्धा आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त इतर संघांकडून खेळताना दिसू शकतात. कारण पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय मेगा ऑक्शन आयोजित करण्याच्या तयारीत आहे.


इशान किशनची सर्वोत्तम कामगिरी; राहुल आणि धवन सारख्या दिग्गजांसाठी ठरणार डोकेदुखी


बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचा विस्तार वाढवला आहे. पुढच्या वर्षी आणखी दोन संघ आयपीएलमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे मेगा लिलाव करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स या दोन खेळाडूंना कायम ठेवू शकणार नाही. आयपीएल नियमानुसार, आयपीएल फ्रँचायझी केवळ तीन भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू राखू शकते, परंतु आरटीएम म्हणजेच राईट टू मॅच कार्डच्या माध्यमातून एक परदेशी आणि अनकॅप्ड खेळाडूदेखील आयपीएलच्या लिलावात रिटेन केले जाऊ शकतात. हे पाहता मुंबई इंडीयन्सचा कॅप्टन रोहित शर्मा, फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि ऑल राऊंडर हार्दिक पांड्याला रिटेन करेल. आणि इशान किशन आणि सुर्यकुमार सारख्या खेळाडुंना ऑक्शनमध्ये पाठवले जाईल. 



क्रिकेटविश्वात ईशानच्या नावाचा डंका ! डेब्यु मॅचमध्येच इतके सारे रेकॉर्ड ऐकून थक्क व्हाल !


आयपीएल २०२२ मेगा लिलावापूर्वी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल नियमात बदल करणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर नियमात काही बदल न केल्यास आयपीएल चॅम्पियन्सला या अडचणीतून बाहेर येण्यासाठी विचार करावा लागेल.


जर मुंबई संघाला हे दोन्ही खेळाडू पुन्हा त्यांच्या टीममध्ये घ्यायचे असतील तर मोठा मोबदला द्यावा लागेल. कारण काही अन्य फ्रॅन्चायझीदेखील या  खेळाडूंना आपल्या लिस्टमध्ये घेऊ इच्छित आहेत. आयपीएल 2022 चा मेगा लिलाव डिसेंबर 2021 मध्ये होणार आहे. त्यावेळी काय होणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.