MI vs RR : मुंबईचा राजा रोहित शर्मा...! वानखेडेवर रोहितच्या चाहत्यांचा कल्ला, पाहा Video
Mumbai Ka Raja Rohit Sharma : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विजयाचा नारळ फोडणार का? असा सवाल विचारला जात असताना आता सामन्यापूर्वी (Mumbai Indians vs Rajasthan Royals) स्टेडियमबाहेर रोहित शर्माचा जयघोष होताना दिसतोय.
Mumbai Indians vs Rajasthan Royals : आयपीएलचा 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पहिल्यांदा आपल्या होमग्राऊंडवर खेळत असल्याने आता मुंबईच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. आजचा सामना खऱ्या अर्थाने मैदानात नाही तर मैदानाबाहेरील स्टेडियमवर रंगणार, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वानखेडेवर जोरदार ट्रोल होईल, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच आता वानखेडे बाहेर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाची जयघोष सुरू झालाय.
मुंबईचा राजा रोहित शर्मा.... अशा घोषणा रोहितचे चाहते वानखेडे बाहेर देत आहेत. वाखनेडे मैदानाबाहेर लांबच्या लांब रांगा देखील लागल्या आहेतय. वानखेडेच्या निळसर वातावरणात मुंबईचे चाहते आता रोहित शर्माची बाजू घेणार की हार्दिक पांड्याची? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, मुंबईचे चाहते फ्रँचायझीच्या निर्णयावर कशी भूमिका मांडणार हे टॉसवेळी दिसून येणार आहे.
पाहा Video
मुंबई इंडियन्सने सध्या टूर्नामेंटमध्ये 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने गमावल्यानंतर पलटण पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. जर राजस्थान रॉयल्स 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता मुंबई विजयाचा नारळ फोडणार का? असा सवाल विचारला जातोय. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत वानखेडे मैदानावर 78 सामने खेळले आहेत. यामध्ये मुंबईने 48 सामने जिंकले आहेत तर 29 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागलं, त्यामुळे पलटणला वानखेडे स्टेडियम पुन्हा लकी ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ - ईशान किशन, हार्दिक पांड्या (C), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस.