मुंबई : कडाक्याच्या थंडीत आज मुंबईमध्ये १७वी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत महिला गटाने भारताच्या सुधा सिंगने बाजी मारली. ४२ किलोमीटरचे अंतर सुधाने २ तास ४५ मिनिटं ३० सेकंदात कापले. तर  महाराष्ट्रची ज्योती गवते दुसरी येण्याचा मान मिळवला आहे. ज्योतीने २ तास ४९ मिनिटं १४ सेकंदात ४२ किलोमीटर अंतर कापले. तर तिसऱ्या स्थानी श्यामली सिंग आली आहे. आता पुरूष गटाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर, अर्धमॅरेथॉनच्या महिला गटात महाराष्ट्रच्या धावपटूंनी चमक दाखवली. आरती पाटीलने १:१८.०३ सेकंद वेळेसह रौप्यपदक मिळवले. तर, नाशिकच्या मोनिका आथरेने १:१८:३३ सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले. या गटात पारुल चौधरीने १:१५:३७ वेळेसह अव्वल स्थान पटकावले.


यावेळी स्पर्धेसाठी एकूण ५५ हजार ३२२ धावपटूंनी नोंदणी केली असून यापैकी पूर्ण मॅरेथॉनसाठी ९ हजार ६६० तर अर्ध मॅरेथॉनसाठी १५ हजार २६० धावपटू मैदानात उतरलेत.. त्याचसोबत ड्रीमरन साठी १९ हजार ७०७ धावपटू, सिनीअर सिटिझन विभागात १ हजार २२ धावपटू, चॅम्पिअन विथ डिसेबिलिटीमध्ये १ हजार ५९६ धावपटू, ओपन १०केमध्ये ८ हजार ३२ धावपटू तर पोलिस कपमध्ये ४५ संघ सहभागी झालेत.


यंदाच्या स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धकांच्या बक्षीस रकमेत वाढ झाली नसली तरी एकूण स्पर्धेत ४ लाख २० हजार यूएस डॉलरची खैरात करण्यात आलीये.