Virat Kohli Video : टी20 विश्वचषकाचं (T20 WC) जेतेपद पटकावणारा (Team India) भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला आणि या संघातं पराकोटीला पोहोचलेल्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं. संघातील प्रत्येक खेळाडूला देशवासियांनी आपलेपणानं Grand Welcome दिलं. दिल्ली दरबारी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधनांनी भारतीय खेळाडूंची भेट घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तिथून या संघानं तडक मुंबई गाठली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत वेगळ्याच माहोलात संघ दाखल झाला. पावसाच्या सरींची बरसात होत असतानाही मुंबईकरांनी लाखोंच्या संख्येनं गर्दी करत खेळाडूंचं स्वागत केलं. दर दुसऱ्या क्रिकेटप्रेमीच्या तोंडी रोहित आणि विराटचच नाव पाहायला मिळालं. 


संघातील प्रत्येक खेळाडूला मुंबईकरांच्या या जनसागरानं भारावून सोडलं. संघाच्या या विक्ट्री परेडमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूवर कॅमेराच्या नजरा खिळल्या होत्या. या विजयोत्सवानंतर संघ थेट वानखेडे स्टेडियमवर दाखल झाला, जिथं  खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मैदानावरही खेळाडूंचा उत्साह पाहण्याजोगा होता. बेन्जो म्हणू नका किंवा मग गाण्याचा सूर, विराट, रोहित, पंत अशा सर्वांनीच ठेका धरला. भर मैदाना विराट आणि रोहितनं तर चक्क गणपती डान्सही केला. 


अतिशय उत्साहातील या स्वागतानंतर जिथं संघ पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेला तिथंच रातोरात विराट कोहली मात्र अचानक कुठे गायब झाला. विराट नेमका गेला कुठे हेच अनेक क्रिकेटप्रेमींना कळेना. बार्बाडोस ते भारत असा 16 तासांचा प्रवास, त्यानंतर संपूर्ण 4 जुलैचा दिवस विजयोत्सव असा जवळपास 40 तासांच्या धामधुमीनंतर संघातील खेळाडू विश्रांती करतील अशी अपेक्षा असतानाच विराट मात्र इथं अपवाद ठरला. 


हेसुद्धा वाचा : Rohit sharma: शेवटी आईच ती! डॉक्टरची अपॉईंटमेंट सोडून विश्वविजेत्या मुलाला भेटायला आली हिटमॅनची आई



दोन दिवस प्रचंद व्यग्र राहिल्यानंतरही विराट अतिशय घाईघाईतच मुंबई विमानतळावर आला आणि तिथं आलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त करत तो घाईघाईतच कुठेतरी निघून गेला. आता विराट नेमका गेला तरी कुठे? हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतानाच ही उत्सुकता फार काळ टिकून राहिली नाही. कारण सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघातील हा अष्टपैलू खेळाडू लंडनला रवाना झाला आहे. 


फॅमिली मॅन विराट... 


विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या वामिका आणि अकाय या दोन्ही मुलांसह लंडनला असून, त्यांनाच भेटण्यासाठी आणि हे यश त्यांच्यासोबत साजरा करण्यासाठी म्हणून विराटनं रातोरात पुन्हा 10 तासांहून अधिक वेळेचा प्रवास केल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, भारतात असताना विराटचं कुटुंब त्याला आयटीसी मौर्य येथे येऊन भेटून गेलं होतं. पण, अनुष्काची, मुलांची अनुपस्थितीही विराटचं मन विचलित करतान दिसली. ज्यामुळं त्यानं तडक त्यांचीच भेट घेण्यासाठी वाट धरल्याचं पाहायला मिळालं.