मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबई शहर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि अनेक क्रिकेटपटू घडवणाऱ्या या मुंबईत आता मात्र क्रिकेटसोबतच आणखी एका खेळाकडेही अनेकांचाच कल वाढताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा खेळ म्हणजे बॅडमिंटन.  क्रीडा क्षेत्रातविषयी स्वारस्य वाटणाऱ्या मुंबईतील खेळाडूंचा आणि पालकांचा आपल्या पाल्याला क्रिकेटपटू नव्हे, तर बॅडमिंटनपटू बनवण्याकडे कल वाढू लागला आहे. 


मुंबईत अनेक ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट असून जवळपास सर्वच ठिकाणी बॅडमिंटन खेळाचं रितसर प्रशिक्षण दिलं जातं. यातच बॅडमिंटन कोच पी. गोपीचंद यांच्या पुढाकारानं मुंबईत दहा ठिकाणी अकॅडमी सुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबईत आता खऱ्या अर्थानं बॅडमिंटनला पोषक असं वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होणार हे नक्की. 



बॅडमिंटन कोच पी. गोपीचंद यांच्या पुढाकारानं मुंबईत ‘बॅडमिंटन गुरुकुल’ नावानं दहा ठिकाणी बॅडमिंटन अकॅडमीही सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबईत आता खऱ्या अर्थानं बॅडमिंटन संस्कृती निर्माण व्हायला मदत होणार आहे. क्रिकेटच्या या पंढरीत बॅडमिंटनंही फुलू लागलं असून भविष्यात मुंबईतूनही ऑलिम्पिक मेडलिस्ट घडतील अशी आशा बाळगूया.