Mumbai News : मुंबईसह भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील दोन मुली आणि एका मुलाने सातासमुद्रापार एरोबिक्स स्पर्धेत भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. दुबईत झालेल्या युरोएशिया एरोबिक्स अँड हिप-होप चॅम्पियनशिपमध्ये मुंबईतील खेळाडूंनी  6 सुवर्णपदक पदकाची कमाई केली आहे. मुंबईतील भांडुपमधील रामानंद डीएव्ही महाविद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निशा चाळके, उर्वी पाताडे आणि नक्षत्र अन्सारी पदकांची आपलं नाव कोरलं आहे. 


सुवर्ण कामगिरी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेत युरोपियन आणि आशिया खंडातील अनेक राष्ट्रांनी सहभाग घेतला होता. भारत, पाकिस्तान, युनायटेड अरब एमिरेट्स, रशिया, कसाकिस्तान, किरगिझंस्तान, या राष्ट्रांनी खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. युरोएशिया एरोबिक्स अँड हिप-होप चॅम्पियनशिप 2023 स्पर्धा संपूर्ण निकाल पाहिल्यास भारतीय पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांक मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. तर रशियाने पहिला क्रमांक तर पाकिस्तानला तिसऱ्या स्थानी होता. (mumbai players 6 gold medals in euroasia aerobics and hip hop championship Trending video on Google Now)


खेळाडूंची पदकांची कमाई


या स्पर्धेत निशा चाळके हिने 17+ या वयोगटात 1 रौप्य पदक (वैयक्तिक मुली) तर 1 सुवर्णपदक (ट्रायो) आपल्या नावी केलं. तर उर्वी पाताडे हिने 17 + वयोगटात 1 कास्य पदक, 1 सुवर्णपदक (मिश्र जोडी), 1 सुवर्णपदक (ट्रायो) असे तीन पदकांवर आपल्या नावावर केले. तिसरा मुंबईकर खेळाडून नक्षत्र अन्सारीने 17+ वयोगट 1 सुवर्णपदक, 1 सुवर्णपदक ( मिश्र जोडी), 1 सुवर्णपदक (टायो) अशी 3 सुवर्णपदक मिळवत हट्रिटक केली आहे. 




दुबईमध्ये युरोएशिया एरोबिक्स अँड हिप-होप चॅम्पियनशिप 2023 स्पर्धे आयोजन दुबईतील द इंडियन स्कूल, सिलिकॉन ओसिस- इंडस्ट्रियल एरिया, दुबई युनायटेड अरब एमिरेट्स इथे करण्यात आले होते. दरम्यान मुंबईतील भांडुपमधील रामानंद डीएव्ही महाविद्यालयात गेल्या वीस वर्षांपासून जिम्नॅस्टिक मल्लखांब फिटनेस एरोबिक्स खेळांडूना घडविण्याचं काम करत आहे. या ठिकाणी तीन वर्षापासून 15 वर्षांपर्यंत मुलं मुली राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केली जातात.