मुंबई : ICC T20 विश्वचषक 2021 स्पर्धेत पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडकडून (New Zealand) भारतीय संघाचा (Team India) पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर काही भारतीय खेळाडूंबद्दल अपशब्द वापरले गेले. यामध्ये भारतीय टी-20 संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) 10 महिन्यांच्या मुलीलाही बलात्काराच्या धमक्या दिल्याचं प्रकरण समोर आले होतं. सोशल मीडियावर दिलेल्या या धमकीची मुंबई पोलिसानी (Mumbai Police) गंभीर दखल घेत कारवाई केली आहे. हैदराबादमधून (Hyderabad) एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वचषकात भारताने पहिले दोन सामने गमावल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि विराट कोहली यांच्याबद्दल अनेक अपशब्द वापरले गेले. विशेषत: कोहलीच्या 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्काराची धमकी देण्यात आली होती. यानंतर दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवून कारवाईची मागणी केली होती. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनेही तपास सुरु केला होता. त्यात एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.


कोण आहे ओरापी?


हैदराबादमधून अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव रामनागेश अकुबथिनी असं असून तो 23 वर्षांचा आहे. रामनागेश हा व्यवसायाने इंजिनिअर आहे. याआधी काही काळ तो फूड डिलिव्हरी अॅपसाठी काम करत होता. 24 ऑक्टोबरला एका अज्ञात सोशल मीडिया अकाऊंटवरुन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मुलगी वामिकाबद्दल आरोपीने अपशब्द वापरत बलात्काराची धमकी दिली होती. 


शमी आणि कोहली टार्गेट


टी20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारतावर 10 विकेटने मात केली. विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच पराभव होता. या सामन्यानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्या धर्मावरुन टीका करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्याच मॅचमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला, यानंतर विराट कोहलीला टार्गेट करण्यात आलं होतं.