मुंबई : आयपीएलच्या लीगमध्ये सर्वात यशस्वी ठरलेली मुंबई टीम पंधराव्या हंगामात अत्यंत वाईट कामगिरी केली आहे. मुंबई टीमने सगळे सामने गमावले आहेत. हंगामातील एकही सामना जिंकण्यात यश आलं नाही. एवढी  वाईट वेळ मुंबईवर येण्यामागे ऑक्शनमध्ये डावलेले खेळाडू असू शकतात का अशीही एक चर्चा होत आहे. मुंबई टीमने जर या 3 खेळाडूंना डावललं नसतं तर आज पराभव हाती आला नसता अशीही एक चर्चा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अहवालानुसार मुंबई टीमने ऑक्शनवेळी 3 मोठ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष केलं त्याचा फटका टीमला बसला. आजवर 5 ट्रॉफीवर नाव कोरणारी मुंबई टीम पंधऱाव्या हंगामात 5 सामने सोडा साधा एक सामनाही आतापर्यंत जिंकू शकली नाही. पॉईंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर मुंबई टीम आहे. कोणते 3 खेळा़डू होते ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणून घेऊया. 


1. क्विंटन डी कॉक
मुंबईने मेगा ऑक्शनमध्ये क्विंटन डी कॉकला ड्रॉप केलं. गेल्यावर्षी तो ओपनिंगला मैदानात उतरायचा. यावेळी ईशान किशन ओपनिंगसाठी उतरत आहे. मात्र प्रत्येकवेळी रोहित आणि ईशानच्या हाती निराशा आली आहे. क्विंटन आता लखनऊ टीममध्ये के एल राहुलसोबत ओपनिंगसाठी खेळत आहे. 


2. राहुल चाहर 
मुंबईसाठी दीपक चाहरने उत्तम कामगिरी करूनही मुंबईने ऑक्शन दरम्यान त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पंजाब टीमने चाहरचं कौशल्य ओळखून आपल्या टीममध्ये खेळण्याची संधी दिली. पंजाबकडून दीपक चाहर उत्तम कामगिरी करत आहे. मुंबई टीममध्ये असलेले अनुभवी आणि उत्तम बॉलर्स अजूनही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे दीपक चाहरची कमतरता जाणवत असणार हे नक्की.


3. ट्रेंट बोल्ट
तिसरं आणि महत्त्वाचं नाव ट्रेंट बोल्ट आहे. जसप्रीत बुमराहच्या एकट्याच्या जीवावर सामना जिंकणं मुंबई टीमला शक्य नाही. त्यामुळे ट्रेंट बोल्टची कमतरता मुंबईला जाणवत असणार. आता बोल्ट राजस्थानकडून खेळत आहे. युजवेंद्र चहल आणि ट्रेंट मिळून धुमाकूळ घालत आहेत. दोघंही राजस्थान टीमला प्ले ऑफपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.