आयपीएल 2019 | राजस्थान विरुद्ध मुंबई, राजस्थानचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
राजस्थानने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे.
जयपूर : राजस्थान रॉयलसमोर आज (२० एप्रिल) तगडया मुंबईचे आव्हान असणार आहे. ही मॅच राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. राजस्थानने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. याआधी दोन्ही टीम गेल्या शनिवारी आमनेसामने आल्या होत्या. या मॅचमध्ये राजस्थानने मुंबईचा त्यांच्याच होमग्राऊंड म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर पराभव केला होता. त्यामुळे राजस्थानने होमग्राऊंडवर केलेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न मुंबईचा असेल.
मुंबई आणि राजस्थान यांच्यात आता पर्यंत २२ मॅच खेळण्यात आल्या आहेत. यापैकी मुंबईने ११ वेळा तर राजस्थानने १० वेळा मॅच जिंकली आहे. तर २००९ मध्ये झालेली एक मॅच ही पावसामुळे रद्द झाली होती. जयपूरमध्ये या दोन्ही टीममध्ये ७ मॅच खेळल्या असून राजस्थानने पाच मॅच जिंकल्या आहेत. तर दोन मॅच मुंबईने जिंकल्या आहेत.
राजस्थानने यंदाच्या पर्वात एकूण ८ मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी राजस्थानला आतापर्यंत केवळ २ मॅच जिंकण्यात यश आले आहे. राजस्थान अंकतालिकेत ४ पॉईंटसह ७व्या क्रमांकावर आहे. राजस्थानने ६ मॅच गमावल्या असल्या तरी आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी राजस्थान आजची मॅच जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल.
मुंबई टीमने खेळलल्या एकूण ९ मॅचपैकी ६ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई अंकतालिकेत १२ पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स टीमचे नेतृत्व आतापर्यंत अंजिक्य रहाणेकडे होते. पंरतू आयपीएलच्या या पर्वातील उर्वरित सर्व मॅचसाठीचे नेतृत्व स्टीवन स्मिथकडे सोपवण्यात आले आहे.
मुंबई : रोहित शर्मा (कैप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), बेन कटिंग, सूर्यकुमार यादव, क्रुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, मयंक मारकंडे, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा
राजस्थान : अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन (विकेटकीपर), स्टीवन स्मिथ (कॅप्टन), एश्टन टर्नर, बेन स्टोक्स, रियान पराग, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, जयदेव उनादकट आणि धवल कुलकर्णी.