रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मुंबई `अजिंक्य`, Syed Mushtaq Ali स्पर्धेचं पहिल्यांदाच पटकावलं जेतेपद!
मराठमोळ्या रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
Himachal Pradesh vs Mumbai Final : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा असताना देशातील मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकत मुंबईने पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं आहे. ईडन गार्डनवर खेळल्या सामन्यामध्ये मुंबईने 3 विकेट्सने हा सामना जिंकला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या संघाने विजय मिळवला आहे. (Mumbai won the title of Syed Mushtaq Ali tournament for the first time marathi sport news)
हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी निर्धारित 20 षटकात 143 धावा केल्या होत्या. एकांत सेनने सर्वाधिक 37 धावा, आकाश वसिस्थ 25 धावा आणि निखिल गुप्ता 22 यांनी हिमाचलला 143 धावांपर्यंत पोहोचण्यास हातभार लावला. मुंबईकडून मोहित अवस्थी तनूश कोटीअनने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
मुंबईची हिमाचलने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना खराब सुरूवात झाली होती. पृथ्वी शॉ 11 धावा, कर्णधार अजिंक्य रहाणे 1 धाव, शिवम दुबे 7 धावा हे मोठी स्वस्तात बाद झाले. त्यामुळे मुंबई संघ अडचणीत सापडला होता. मात्र श्रेयस अय्यर 34, यशस्वी जैसवाल 27 धावा आणि सर्फराज खान नाबाद 36 धावा यांच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात हिमाचलवर विजय मिळवला. सर्फराजने आपल्या अनुभवचा पुरेपूर फायदा घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.