दुबई : आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब आमनेसामने आहे. यंदाच्या हंगामात देखील मुंबई इंडियन्स संघ  प्रबळ दावेदार मानला जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2020 मधील आज रंगणारा हा ३६वा सामना आहे. यापूर्वी यंदाच्या हंगामात खेळल्या गेलेल्या या दोन संघांच्या पहिल्या सामन्यात मुंबईने किंग्ज इलेव्हनच्या संघाला ४८ धावांनी पराभूत केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे मागच्या पराभवाचा बदला आता किंग्स इलेव्हन पंजाब संघ घेण्यार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी पंजाबने संघामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


मुंबई इंडियन्सचे खेळाडू (Mumbai Indians Team): रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, राहुल चाहर, नाथन कुल्टर नाइल, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.


किंग्स इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab Team): लोकेश राहुल (कर्णधार), क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मुजीब उर रहमान, क्रिस जॉर्डन, मरुगन अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह.