मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना असून मुंबईत जिंकणारी टीम ही सीरिज जिंकणार आहे. दरम्यान मुंबईत वानखेडेवर हा सामना खेळवला जात असून या सामन्यातून मुंबईकर अजिंक्य रहाणेले टीममधून डच्चू देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला तीन मोठे झटके बसले आहेत. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि पहिला कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे दुखापतींमुळे या सामन्यातून बाहेर पडले आहेत.



बीसीसीआयने यांसदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. गेल्या काही काळापासून अजिंक्य रहाणेचा खेळ चांगला झाला नाही. रहाणे प्रमाणे चेतेश्वर पुजाराही मोठी खेळी खेळू शकलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात यापैकी कोणत्या खेळाडूचं स्थान धोक्यात येणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं होतं. अखेर दुखापतीमुळे मुंबईकर अजिंक्य रहाणेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.


2013 मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून अजिंक्य रहाणेने भारतासाठी 79 कसोटी सामने खेळले आहेत, परंतु त्याला अद्याप आमच्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळालेली नाही. 2016 मध्ये त्याला इंग्लंडविरुद्ध ही संधी मिळाली होती, पण बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो त्या मालिकेतून बाहेर पडला होता. 


आता पाच वर्षांनंतर त्याला पुन्हा एकदा त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र यंदाचीही त्याची संधी हुकली आहे.