मुंबई : मुंबईकर पृथ्वी शॉकडे अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची धुरा सोपवण्यात आलीय. स्थानिक क्रिकेटमध्ये विक्रमांच्या राशी रचणारा पृथ्वी शॉ आता भारतीयांना अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकून देण्याचं स्वप्न दाखवतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी शॉ नं वयाच्या १५ व्या वर्षीच आपली दखल संपुर्ण क्रिकेट जगताला घ्यायला भाग पाडलं होतं. हॅरिस शिल्डमध्ये ५४६ रन्सची स्फोटक इनिंग खेळत त्यानं आपण उद्याचे चॅम्पियन्स असल्याचं सिद्ध केलं होतं.


शालेय क्रिकेटमध्ये ५०० रन्सची इनिंग खेळणाऱ्य़ा या मुंबईकर क्रिकेटपटूकडे तेव्हापासून लंबी रेस का घोडा असल्याचं पाहिलं जातं होतं. आता तर या युवा क्रिकेटपटूकडे अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची धुरा सोपवण्यात आलीय. बॅटिंगमध्ये तर त्यानं आपली गुणवत्ता सिद्ध केलीय. आता एक धुर्त कॅप्टन म्हणून जगाला आपली ओळख करुन देण्यास तो सज्ज असेल.


१३ जानेवारीपासून न्यूझीलंडमध्ये हा अंडर-१९ वर्ल्ड कप होणार आहे. त्यावेळी पृथ्वी भारतीय टीमचं नेतृत्व करणार आहे.


पृथ्वी शॉनं हॅरिस शिल्ड टुर्नामेंटमध्ये रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना ५४६ रन्सची मॅरेथॉन इनिंग खेळली होती. या इनिंगमध्ये त्यानं ८५ फोर आणि ५ सिक्सर लगावले होते. शालेय क्रिकेटमध्ये ५०० रन्स करणारा तो एकमेव क्रिकेटर बनला होता.


५ वर्षानंतर त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये आणखी एका रेकॉर्ड मोडित काढला. त्यानं आपल्या दुलीप ट्रॉफीची पहिल्याच लढतीत सेंच्युरी झळकावली होती. दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या लढतीत सेंच्युरी झळकावणार तो सचिन तेंडुलकरनंतर दुसरा क्रिकेटपटू आहे. यानंतर रणजी ट्रॉफीतही त्यानं याचीच पुनरावृत्ती केली. रणजीतही सचिननंतर पदार्पणात सेंच्युरी ठोकणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 


सचिन तेंडुलकरला आदर्श मानणाऱ्या पृथ्वी शॉ याच्याकडे भावी सचिन म्हणून पाहिलं जातंय. सचिनकडून पृथ्वीचा सत्कारही करण्यात आलाय. एक बॅट्समन म्हणून तो सचिनच्या पावलावर पाऊल टाकतं आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. आता अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये तो भारतीय टीमचं नेतृत्व करणार आहे.


अंडर-१९ टीमनं भारताला अनेक क्रिकेटपटू दिलेत. त्याचप्रमाणे त्यांनं भारताला हा वर्ल्ड कप जिंकून दिला तर मोहम्मद कैफ, विराट कोहली आणि उन्मुक्त चंदनंतर तो चौथा क्रिकेटपटू ठरेल.



अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची धुरा पृथ्वीकडे