मुंबई : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला. दिनेश कार्तिक हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या बॉलला ५ रन्सची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकनं ८ बॉल्समध्ये २९ रन्सची स्फोटक खेळी केली. कार्तिकच्या या इनिंगमध्ये ३ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या दिनेश कार्तिकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा क्रिकेटपटू मुरली विजयनंही या विजयाबद्दल ट्विट केलं. पण या ट्विटमध्ये त्यानं दिनेश कार्तिकचा उल्लेखही केला नाही. दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्यामधले वाद सगळ्यांनाच माहिती आहेत. पण भारताच्या विजयाबद्दल ट्विट करताना कार्तिकचं नाव न घेतल्यामुळे मुरली विजयवर अखिलाडूवृत्ती दाखवल्याची टीका होत आहे. हे ट्विट करताना मुरली विजयनं बीसीसीआयला टॅग केलं आहे.