कोलंबो : निडास ट्रॉफीच्या टी-२० सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेला पराभूत केले. श्री लंकेची राजधानी कोलंबो येथील के आर. प्रेमदासा स्टेडियमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांग्लादेशने हा विजय मिळवला. विकेटकीपर आणि फलंदाज मुशफिकुर रहमान हा विजयाचा शिल्पकार ठरला. मुशफिकुरचा या विजयादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडिओत मुशफिकुर नागीण डान्स करताना दिसत आहे. तेही मैदानावर. डावखुऱ्या मुशफिकुरने ३५ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या. बांग्लादेशने या ७२ धावांच्या जोरावर श्रीलंकेने दिलेले २१५ धावांचे लक्ष्य पूर्ण करत शानदार विजय मिळवला. या खेळीबद्धल मुशफिकुरला सामनावीर म्हणूनही घोषीत करण्यात आले. ३० वर्षीय फलंदाज मुशफिकुरने सामन्यात ४ षटकार आणि ५ चौकार ठोकले.  



>