Mushfiqur Rahim 'handling the ball' OUT : ढाक्यामध्ये सध्या न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळण्यात येतोय. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अशी एक घटना घडली जी क्रिकेटच्या इतिहासात क्विचितच घडताना दिसते. झालं असं की, बांगलादेशाचा फलंदाज मुशफिकुर रहीम याला 'Handled the Ball' मुळे आऊट करार देण्यात आला. अशा पद्धतीने आऊट होणारा मुशफिकुर रहीम बांगलादेशाचा पहिलाच असा फलंदाज ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा विचित्र पद्धतीने आऊट होणारा तो बांगलादेशचा पहिला कसोटीपटू ठरला असून त्याच्या या पद्धतीची क्रिकेट विश्वात चर्चा होतेय. मुशफिकुरच्या बाद करण्याच्या पद्धतीला Handled the Ball असं म्हटलं जात होतं, परंतु 2017 मध्ये आयसीसीने त्याचा समावेश ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियमात केला होता.


मुश्फिकुरला छोटी चूक पडली महागात


दुसऱ्या टेस्ट सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीमची सुरुवात खराब झाली. 41 रन्सवर चार विकेट गमावल्यानंतर अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार मुशफिकूरने क्रीझवर विचित्र पद्धतीने विकेट गमावसी. एका छोट्याशा चुकीमुळे त्याला पव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. 


ही घटना डावाच्या 41व्या ओव्हरमध्ये घडली. झालं असं की, 35 रन्सवर फलंदाजी करणाऱ्या मुशफिकुरने वेगवान गोलंदाज काईल जेमिसनच्या बॉलचा बचाव केला. मात्र यानंतर बॉल विकेट्सपासून दूर जात असताना त्याने उजव्या हाताने रोखण्याचा प्रयत्न केला. बॉल विकेटच्या दिशेने जात नसतानाही क्रिकेटच्या नियमानुसार, त्याला बाद घोषित करण्यात आलं. बॉलला हात लावताच न्यूझीलंडच्या खेळाडूंनी थर्ड अंपायरची मदत घेतली आणि अखेरीस मुशफिकूर पव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. 



काय आहे 'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड'चा नियम?


नियमानुसार फिल्डरच्या परवानगीशिवाय कोणताही फलंदाज बॉलला हाताने स्पर्श करू शकत नाही. बॉल खेळण्यासाठी फलंदाजाला प्रथम बॅटचा वापर करावा लागतो. हा नियम मोडल्यास खेळाडूला आऊट करार दिला जाऊ शकतो. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) ने बनवलेला नियम 33 नुसार, बॉल खेळल्यानंतर फलंदाजाने मुद्दाम हाताने किंवा हाताने बॉलला हलवण्याचा प्रयत्न केला, तर 'हँडल्ड द बॉल' अंतर्गत त्याला आऊट करार दिला जाऊ शकतो.