T20 World Cup आधी मुथय्या मुरलीधरनचं मोठं वक्तव्य, आश्विनला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला...
T20 World Cup 2022 च्या आधी महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने टीम इंडियाच्या गोलंदाजीवर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यानं आर अश्विनचंही जोरदार कौतुक केलं...
Muttiah Muralitharan on Team India: टी-20 विश्वचषक 2022 मधील भारत आणि पाकिस्तान (Ind VS Pak) सामन्यासाठी आता फक्त काहीच दिवस बाकी आहेत. सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) भारत प्रबळ दावेवार संघ आहे. अशातच आता श्रीलंकेचा माजी स्टार फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे त्याच्या या वक्तव्याची जागतिक क्रिकेटमध्ये एकच चर्चा होताना दिसत आहे.
तब्बल तीन वर्ष लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधून बाहेर राहिलेल्या आर आश्विनला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघात संधी मिळाली. मात्र, प्लेइिंग 11 मध्ये खेळण्यासाठी त्याला अजूनही संघर्ष करावा लागतोय. अशातच आता आश्विनवर मुथय्या मुरलीधरन याने मोठं वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाला Muttiah Muralitharan -
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अव्वल भारतीय फिरकीपटूंमध्ये चुरशीची स्पर्धा असते. रेड बॉल क्रिकेटमध्ये फारशी स्पर्धा नाही कारण अश्विन (R Ashwin) सर्वोत्तम आहे, परंतु जसं आपण T20 पाहतो, आयपीएलमुळे बरेच प्रतिभावान खेळाडू आहेत. T20 मध्ये बरेच सामने खेळले जातात. यातून भारतीय क्रिकेटची खोली निश्चितपणे दिसून येते, असं मुरलीधरन म्हणाला आहे.
दरम्यान, तुम्ही फक्त कॅरम बॉल टाकू शकत नाही. आपल्याला बॉलिंग करताना मिश्रण करावं लागेल. आमच्या काळातही आम्ही पारंपरिक ऑफ स्पिनसह फ्लॉटर बॉल वापरायचो. तुम्ही एकाच प्रकारचा चेंडू सतत टाकू शकत नाही कारण फलंदाज तुम्हाला चांगलंच वाचतो. शीर्षस्थानी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गोलंदाजीत वैविध्य आणावं लागेल, असंही मुरलीधरन म्हणाला आहे.