Sachin Ramesh Tendulkar: क्रिकेटचा देव, शतकसम्राट, बॉलर्सचा कर्दनकाळ... अशा किती उपाध्या द्याव्या तेवढ्या कमी. टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने नुकतंच आपल्या आयुष्याची हाफ सेंच्यूरी (Sachin @ 50) पूर्ण केली. कुरळ्या केसांचा सर्वांचा लाडका सचिन आता बघता बघता 50 वर्षांचा झालाय. वाढदिवसानिमित्त (Sachin Tendulkar Birthday) त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी सचिन तेंडूलकरच्या मेसेजचा एक किस्सा सांगितला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्षा भोगले, सुनंदन लेले आणि विक्रम साठे या तीन दिग्ग्जांनी गप्पा गोष्टींचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये हर्षा भोगले (Harsha Bhogle On Sachin Tendulkar) यांनी सचिनच्या मेसेजचा मजेशीर किस्सा सांगितला. हर्षा भोगले यांनी सचिनला त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त एक मॅसेज केला होता. त्यावर उत्तर देताना सचिन भावूक (Sachin Tendulkar Emotional) झाल्याचं पहायला मिळालं.


उद्या 50 होशील, 100 खूप केले पण ते एका क्रिकेटपटूचे होते, हे 50 एका उत्तम माणसाचे आहेत, असाच रहा, असा मेसेज हर्षा भोगले यांनी केला होता. त्यावर सचिनने हर्षा भोगले यांना रिप्लाय केला. 'कदाचित माझ्या वडिलांनी मॅसेज पहिला असता', असं उत्तर सचिनने हर्षा यांना दिलं. सचिनचे वडील खूप शांत आणि सयंमी माणूस होते. त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की, क्रिकेटर येतात जातात पण माणूस नाही बदलत कधी, असा हर्षा भोगले सांगतात.


पाहा Video 



अर्जुन (Arjun Tendulkar) ज्यावेळी लास्ट ओव्हर करत होता तेव्हा सचिन खूप प्रेशर मध्ये होता, जे प्रेशर त्याने संपूर्ण क्रिकेटिंग आयुष्यात झेललं नाही. हे एका बापाचं प्रेशर होतं, असं हर्षा भोगले यांनी बोलताना म्हटलं आहे. त्यावेळी तिन्ही दिग्ग्जांनी सचिनच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.  सुनंदन लेले यांचा 'तेंडल्या' चित्रपट (Tendlya) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. तसेच 24 एप्रिल हा दिवस जागतिक क्रिकेट दिन म्हणून साजरा केला जावा, अशी इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.


आणखी वाचा - WTC 2023 Final: Ajinkya Rahane ला संधी का मिळाली? Sunil Gavaskar यांनी कारण सांगत निवडली Playing XI


दरम्यान, ब्रोवो ज्यावेळी मुंबईसोबत जोडला गेला त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) त्याच्याकडं दोन बॅट होत्या. सचिनने दोन्ही बॅट खटखटतून पहिल्या तेव्हा त्याने पहिल्या नंबरची बॅट ब्रावोकडे दिली. ब्रावो चकित झाला, त्याने तुला कसं माहिती ही बॅट मी वापरणारे, असा सवाल केला. त्यावेळी 'बॅट माझ्याशी बोलते' असं उत्तर दिलं होतं.