Dhruv Jurel, Rajasthan Royals:  इंडियन प्रिमियम लीग (IPL 2023) म्हणजे अनेक युवा खेळाडूंसाठी टीम इंडियाच्या प्रवेशाचं गोल्डन दार. अनेक खेळाडूंना घडवण्यासाठी आयपीएलचा खूप मोठा वाटा राहिला आहे. यंदाच्या हंगामात यशस्वी जयस्वाल, सुयश शर्मा, साई सुदर्शन, जितेश शर्मा यांच्यासह आणखी एक नाव झळकतंय, ते म्हणजे ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) याचं. ध्रुव जुरेल सध्या राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) मॅच फिनिशरची भूमिका बजावताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या (CSK vs RR) सामन्यात ध्रुवने 15 चेंडूत 34 धावा ठोकल्या आणि राजस्थानला 32 धावांनी विजय मिळवून दिला. सीएसकेविरुद्धचा हा सामना पाहण्यासाठी ध्रुवचं संपूर्ण कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित होतं. आपल्या लेकाला खेळताना पाहून ध्रुवचे वडील (Dhruv Jurel father) भारावून गेले. अशातच आयपीएलच्या ट्विटर हँडलवरून ध्रुव जुरेलचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.


ध्रुवने या व्हिडिओमध्ये त्याच्या वडिलांनी दिलेला सल्ला सर्वांना सांगितला. मेहनत करणे तुमच्या हातात आहे, फक्त ते कर. तुम्ही ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकता त्यावर लक्ष केंद्रित करा. मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे, असं ध्रुव म्हणतो. माझ्यासाठी धोनीला (MS Dhoni) भेटणं हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे. मागच्या वर्षीही भेटलो होतो. पण 5 मिनिटं मी त्याला पाहत राहिलो, असा किस्सा देखील ध्रुव सांगतो.


चेन्नईविरुद्धचा सामना पाहिल्यानंतर वडील खुश झाले. कारण त्या सामन्यात मी 34 धावांची महत्त्वाची खेळी खेळली होती आणि संघही जिंकला होता. माझ्या वडिलांनी हा सामना पाहिला, त्याचे डोळे पाणावले होते. सामन्यानंतर ते भावूक झाले. तू माझं जीवन सार्थ केलंय, असं ते मला म्हणाले होते, असंही ध्रुव सांगतो.


पाहा Video 



दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ध्रुव जुरेलने महेंद्र सिंह धोनीला रनआऊट केलं होतं. या धावबादमुळे ध्रुव निराश झाला नाही, तर आनंदी होता. स्कोअरकार्डमध्ये माझं आणि धोनीचं नाव असेल, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असंही ध्रुव यावेळी म्हणाला आहे. ध्रुव जुरेल याने आत्तापर्यंत 9 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात 141 धावा त्यांनी केल्यात. यात 11 फोरचा समावेश आहे.