Mystery girl 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये तीन सामन्यांची सिरीज सुरु असून ऑस्ट्रेलियाने दुसरी वनडे जिंकली. 10 विकेट्सने ऑस्ट्रेलियाने (aU) भारताचा पराभव केला. भारताच्या भूमिवर ऑस्ट्रेलियाने केलेला हा मोठा पराभव असल्याचं मानलं जातंय. या विजयासह कांगारूंनी सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. मात्र दुसरीकडे या सामन्यात एक मिस्ट्री गर्ल दिसली, जिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 


कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणीही नाहीये, तर ऑस्ट्रेलियाची महिला सपोर्ट स्टाफ आहे. मुख्य म्हणजे, तिच्या सुंदरतेने तिने सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही हा अंदाज लावू शकता.


ऑस्ट्रेलियाच्या सपोर्ट स्टाफने जिंकलं मनं 


विशाखापट्टणममध्ये दुसरी वनडे खेळवण्यात आली. यावेळी सामना सुरु असताना ऑस्ट्रेलियाच्या एका सपोर्ट स्टाफने सर्वांवर सौंदर्याची भुरळ पाडली. ज्यावेळी कांगारू फलंदाज टीम इंडियांच्या गोलंदाजांची धुलाई करत होते, त्यावेळी कॅमेराने या मिस्ट्री गर्लला कैद केलं.


ऑस्ट्रेलियाची ही महिला सपोर्ट स्टाफ डगआऊटमध्ये बसली होती. यावेळी कांगारू फलंदाजांच्या सिक्स आणि फोरवर ती आनंद घेत होती. यावेळी ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांच्या तुफान फलंदाजीवर टाळ्या वाजवल्या. यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



महिला सपोर्ट स्टाफचं विराटशी खान कनेक्शन


गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्डकप दरम्यान या सपोर्ट स्टाफची चांगलीच चर्चा रंगली होती. याचं मुख्य कारण होता टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली. T20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सराव सामना खेळला गेला होता. या सामन्यात विराटने बाऊंड्री लाईनवर उडी मारली आणि एका हाताने कॅच घेतला. त्यावेळी या महिला सपोर्ट स्टाफची रिएक्शन पाहण्यासारखी होती. तेव्हा पासून सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली होती.


तिसरी वनडे ठरणार निर्णायक


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी वनडे खूप महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या 11 ओव्हर्समध्ये सामना संपवला. हेड आणि मार्श या दोघांनी अवघ्या 11 ओव्हर्स म्हणजेच 66 बॉल्समध्ये सामना संपवला. दरम्यान या पराभवामुळे टीम इंडियाच्या नावे एका नकोश्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.