अमर काणे, प्रतिनिधी, नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावणारे दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी या दोन अवघ्या १३ वर्षांच्या बुद्धीबळपटूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. लहान वयात मुलं एका जागेवर बसत नाहीत, कार्टून पाहतात अशी तक्रार घराघरातून ऐकायला येते. मात्र लहान वयातच मनावर कमालीचं नियंत्रण आणि दृढ निश्चय यामुळे नागपूरच्या दोन लहानग्या बुद्धीबळपटूंनी, थेट शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचा पराक्रम केला आहे. रौनक सध्या ऑस्ट्रिया आणि रशियात सुरू असलेल्या स्पर्धात खेळत आहे. खुद्द विश्वनाथन आनंदनेही रौनकच्या बुद्धीबळातल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर वुमन इंटरनॅशनल मास्टर असलेल्या १३ वर्षांच्या दिव्यानेही याच यशाला गवसणी घातली आहे. मोबाईल, टीव्ही या प्रलोभनांपासून ती दूरच राहते. तिच्या डोक्यात सातत्याने बुद्धीबळाचेच विचार सुरू असतात.


ध्येय गाठण्यासाठी करावा लागणारा त्याग, मनावरचं नियंत्रण हे भल्या भल्यांना जमत नाही. मात्र या दोन चिमुरड्यांनी या लोभांवर सहज मात करत यश पटकावलंय. त्यांचा हा आदर्श प्रत्येकानेच घेण्यासारखा आहे.