Ravindra jadeja talk PM Narendra Modi : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र धोनी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या पहिल्या भेटीचा मोठा खुलासा केला आहे. या तिघांची 2010 साली भेट झाली होती. त्या भेटीमध्ये धोनीला मोदींनी काय सांगितलं होतं? याबाबत जडेजाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. (Narendra Modi was the Chief Minister Dhoni... Jadeja revealed 12 years ago meeting marathi sport news) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2010 मध्ये झाली होती मुलाखत 2010 मध्ये अहमदाबादमध्ये मी मोदींना भेटलो होतो त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोटेरा स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका सामना होता. या भेटीवेळी माही भाईने माझी ओळख करून देताना हा रविंद्र जडेजा असं सांगताच मोदींनी, हलकंफुलकं हसत हसत अरे हा तर आपला पोरगा आहे, लक्ष असूद्या असं म्हटलं होतं. या 12 वर्षांआधीच्या भेटीबद्दल जडेजा सांगत आहे.


इतकंच नाही तर, मोदींनी मला इतक्या खुलेपणाने आपला मुलगा म्हटलं ते खूप वेगळं होतं. मलाही ते खूप भावलं होतं. 2019 मध्ये मी आणि माझी पत्नी दिल्लीमध्ये मोदींना भेटलो होतो तेव्हाही त्यांनी आम्हाला 20 ते 25 मिनिटे दिली होतीत. माझ्या पत्नीला विचारलं की तू काय करते? पुढे काय करायचं आहे, गुजरातच्या विकासासाठी आणखी काय करता येईल असे दिलखुलास प्रश्न विचारल्याचं जडेजाने सांगितलं.



दरम्यान, रविंद्र जडेजाच्या गुडघ्यावर यावर्षी सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तो सध्या क्रिकेटपासून दूर पळत आहे. रवींद्र जडेजा सध्या रिहॅबमधून जात असून टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. IPL 2023 मध्ये जडेजा पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.