Nasser Hussain On Virat kohli : वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला अन् करोडो भारतीयांचं स्वप्न धुळीस मिळालं. अशातच आता टीम इंडियाचं लक्ष टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर (T20 World Cup 2024) असणार आहे. अशातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सध्याचे समालोचक नसील हुसैन (Nasser Hussain) यांनी याबाबत भाकीत केले आहे. नसीलने आयसीसीशी बोलताना त्या दोन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत जे 2024 मध्ये आपल्या कामगिरीने खळबळ माजवू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले नासिर हुसैन?


माझा पहिला मेगास्टार आहे आणि यात शंका नाही.. विराट कोहली. साहजिकच 2023 आणि विश्वचषक त्याच्यासाठी खूप छान होता. त्याने 2023 मध्ये अनेक विक्रम मोडले आहेत. आता तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. तांत्रिकदृष्ट्या मी विराटची फलंदाजी इतकी चांगली कधीच पाहिली नाही, बॅटचा आवाज, मुंबईत श्रीलंकेविरुद्धची ती खेळी, मी अशा पाच डावांची नावे सांगू शकतो जिथे त्याने अप्रतिम फलंदाजी केली. भारत आणि विराटच्या चाहत्यांसाठी चांगले संकेत आहेत. याचा अर्थ त्याची मानसिक स्थिती चांगली आहे आणि त्याचा खेळही चांगला आहे. मला विश्वास आहे की यंदाही कोहलीची कामगिरी स्फोटक असेल, असं नासिर हुसैन म्हणाले आहेत.


बाबर आझमला (Babar Azam) वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये आयसीसी टी -20 विश्वचषक 2024 सह मोठ्या धावसंख्येची आवश्यकता आहे. मला वाटते की हे वर्ष त्याच्यासाठी आणि पाकिस्तानसाठी खूप मोठे आहे. त्याने कर्णधारपद सोडले आहे, कदाचित त्याच्या खांद्यावरून ओझे दूर झाले असावे. पाकिस्तान क्रिकेटसाठी तो सर्वात मोठी गोष्ट करू शकतो ती म्हणजे खोऱ्यानं धावा काढणं. पाकिस्तानला चांगली कामगिरी करायची असेल तर बाबरला धावा कराव्या लागतील, असंही नासिर हुसैन यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ऋषभ पंतवर देखील विश्वास दाखवलाय.


दरम्यान, टीम इंडियाला ऋषभ पंतची जागा भरून काढता आली नाही. मात्र, केएल राहुलने त्यांची उनिव भासू दिली नाही. आता त्याला पुन्हा मैदानात पहायची इच्छा झाली आहे. हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळतील तेव्हा टीम इंडिया अधिक मजबूत स्थितीत दिसेल, असंही नासिर हुसैन म्हणतात.