मुंबई : इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या दोन खेळाडू नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट यांनी लग्न केले आहे. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंनी 29 मे रोजी लग्न केले आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट यांच्या लग्नाची बातमी समालोचक ईशा गुहाने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर 2019 मध्ये नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट दोघांनी सारखपुडा केला.  साखरपुड्यानंतर 2020 मध्ये दोघी लग्न करणार होत्या. पण कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे दोघींनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.



नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींना डेट करत आहेत. 2017 मध्ये दोन्ही क्रिकेटपटूंनी त्यांचं नात जगासमोर मान्य केलं. शिवाय दोघींनी 2018 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दोघींनी आता लग्न केलं आहे. 


समलिंगी विवाहाची ही पहिलीच घटना नाही
नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट यांचा विवाह हा महिला क्रिकेटमधील पहिला समलिंगी विवाह नाही. 2017 मध्ये, न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटू एमी सॅडरवेट आणि लिया ताहुहू यांनी लग्न केलं.


त्यानंतर 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू डेन व्हॅन निकेर्क आणि अष्टपैलू मॅरिजने कॅप हिच्यासोबत लग्न केलं. 2019 मध्ये न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हेली जेन्सन आणि ऑस्ट्रेलियन निकोला हॅनकॉक यांनी लग्न केलं.