Nathan Lyon spins magic : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सिरीजमध्ये (Border–Gavaskar Trophy) टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र उद्या म्हणजेच शुक्रवारी तिसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा (Australia) विजय होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाच्या टीमला 76 रन्सचं आव्हान दिलं गेलंय. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचा पराभव होणार हे चाहत्यांनी जवळपास मानलं आहे. मॅथ्यू कुह्नेमन आणि नॅथन लिऑन (Nathan Lyon) यांच्या जोडीने टीम इंडियाच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. दुसऱ्या डावामध्ये अवघ्या 163 रन्सवर टीम इंडियाचा ऑलआऊट (Team India All Out) झाला. 


दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी कर्दनकाळ बनला नॅथन लिऑन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या लंच ब्रेकपूर्वी टीम इंडियाने (IND vs AUS) दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात केली होती. यावेळी लंचपर्यंत 13 नाबाद असा स्कोर भारताचा होता. मात्र लंचनंतर टीम इंडियाचा खेळ काही चांगला झालेला दिसला नाही. चहापानापर्यंत टीम इंडियाने महत्त्वाचे विकेट्स गमावले होते. या सेशनमध्ये कांगारूंचा स्पिनर लिऑन भारतासाठी भारी पडला. 


लिऑनने कर्णधार रोहित शर्मा (12) शुभमन गिल (5) आणि रवींद्र जडेजा (7) हे महत्त्वाचे विकेट्स पटकावले होते. यावेळी तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेतेश्वर पुजाराने एका बाजूने भारताचा मोर्चा सांभाळून धरला. त्याने शानदार अर्धशतक झळकावत 59 रन्सची खेळी केली.


 श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारावे सावरला डाव


चहापानानंतर 79 रन्सच्या स्कोरचा पाठलाग करताना तब्बल तासभर टीम इंडियाने एकंही विकेट गमावली नाही. यावेळी मैदानात श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांची जोडी खेळत होती. दोघांना 35 रन्सची पार्टनरशिप केली आणि स्कोर 113 पर्यंत नेण्यास मदत केली. मात्र यावेळी स्टार्कने अय्यरचा अडथळा दूर केला.  


लिऑनसमोर टीम इंडियाचे फलंदाज गडगडले


त्यानंतर इंदूरच्या मैदानावर पुन्हा एकदा लिऑन नावाचं वादळ आलं आणि भरत (3), अश्विन (16) आणि उमेश (0) यांची विकेट घेत टीम इंडियाला कमकुवत केलं. याशिवाय त्याने एका बाजूला डटून उभा असलेल्या चेतेश्वर पुजाराचाही काट काढला. नॅथनच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथकडे कॅच देऊन 59 रन्सवर पुजारा पव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यादवनंतर मोहम्मद सिराजला बोल्ड करत 8 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला.


टीम इंडियाचा पहिला डाव


इंदूर टेस्ट सामन्यामध्ये प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय टीमने आपल्या डावात केवळ 109 रन्स केले. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 रन्सची खेळी केली. टीम इंडियाकडून कोणत्याही खेळाडूला 30 रन्सचा आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियन टीमकडून स्पिनर मॅथ्यू कुहनमॅनने सर्वाधिक 5 आणि नॅथन लायनने 3 विकेट्स घेतले. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 रन्समध्ये आटोपला.