Rohit Sharma Indian Flag Controversy: 29 जून ही तारीख कोणताही क्रिकेट चाहता विसरणार नाही. याच दिवशी रोहित शर्माने कोट्यवधी टीम इंडियाच्या चाहत्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. तब्बल 11 वर्षांनी वर्ल्डकप भारतात आला. तेव्हापासून दररोज रोहित शर्मा चर्चेचा विषय ठरलाय. अशातच रोहितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंडचा फोटो देखील बदलला आहे. मात्र यावरून आता मोठा वाद झाल्याचं दिसून येतंय. 


रोहित शर्माच्या प्रोफाईल फोटोमुळे मोठा वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. टी-20 वर्ल्डकप ट्रॉफी जिंकल्यामुळे, नंतर त्याच्या निवृत्तीबद्दल, नंतर विजयाच्या परेडमधील त्याच्या फोटोंवरून. पण सध्या रोहित शर्मा एका वादामुळे चर्चेत आहे. रोहित शर्माने त्याच्या X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या नवीन प्रोफाइल फोटोवरून हा वाद निर्माण झाला आहे. ज्यावर सोशल मीडिया यूजर्सने त्याला तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. 


रोहित शर्माने केला तिरंग्याचा अपमान?


8 जुलैच्या संध्याकाळी सोशल मीडिया साईटवर रोहित शर्माने त्याचा प्रोफाईल फोटो बदलला. मात्र विश्वविजेत्या कर्णधाराने ट्विटरवर प्रोफाईल फोटो बदलताच त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यावेळी रोहित शर्माने देशाचा राष्ट्रध्वज तिरंग्याचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. 


T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितने बार्बाडोसच्या केनसिंग्टन ओव्हलवर भारतीय ध्वज रोवल्याचे फोटो प्रोफाइलवर लावला आहे. रोहितचा उद्देश क्रिकेटविश्वात भारताचा दबदबा दाखवणं हा बहुधा असला, तरी परदेशी भूमीवर राष्ट्रध्वज रोवणं चाहत्यांना अयोग्य वाटतंय. याशिवाय दुसरीकडे फोटोमध्ये राष्ट्रध्वज जमिनीला स्पर्श करत असल्याचं समोर आलंय. यावेळी चाहत्यांनी 1971 च्या राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायद्याचा देखील हवाला दिला आहे, ज्यामध्ये असं म्हटलंय की, "ध्वज जाणूनबुजून जमिनीला स्पर्श करू नये किंवा पाण्यात पडू देऊ नये."




दरम्यान हा तिरंग्याचा अपमान असल्याचं चाहत्यांनी ट्विट करून रोहित शर्माला सांगितलंय. यावेळी एका चाहत्याने लिहिलंय की, ध्वज संहितेच्या नियमांनुसार, तिरंगा ध्वज जमिनीवर लावू नये. तिरंग्याचा अपमान करू नका, असे आवाहन त्यांनी रोहित शर्माला केलंय. रोहितने हे काम भारतात केलं असतं तर मोठा गदारोळ झाला असता, असे अनेकांनी सांगितले. 


रोहितवरच्या भावनेवर प्रश्न उपस्थित करणं योग्य?


टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर रोहितने बार्बाडोसच्या मैदानात आपल्या देशाचा झेंडा रोवला होता. यावेळी भारतीय कर्णधार भावूक झाला होता आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचललं यात शंका नाही. त्यामुळे तिरंग्याचा अपमान करण्याचा रोहितचा हेतू कधीच नव्हता.