Naveen-ul-Haq banned In ILT20 : आयपीएलच्या 17 व्या सिझनचा लिलाव उद्या दुबईत पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज नवीन उल हक (Naveen-ul-Haq) याला या लीगमध्ये खेळण्यास 20 महिन्यांसाठी बंदी घातलण्यात आली आहे. इंटरनॅशनल लीग टी-ट्वेंटीने ही कारवाई केली आहे. एवढंच नाही तर कराराचं उल्लंघन केल्याबद्दल मोठा दंडही त्याला भरावा लागणार आहे. आयएलटी 20 च्या 3 सदस्यीय शिस्तपालन समितीने नवीन आणि शारजाह वॉरियर्सच्या दोन्ही बाजू स्वतंत्रपणे ऐकल्या आणि सर्व पुरावे तपासले. यानंतर त्यांनी नवीनवर 20 महिन्यांची बंदी घातली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं कारण काय?


शारजा वॉरियर्सने स्पर्धेच्या पहिल्या सत्रासाठी नवीन-उल-हकला करारबद्ध केलं होतं. परंतू नवीनला वॉरियर्सने आणखी एका वर्षाच्या मुदतवाढीची ऑफर दिली होती परंतु त्याने सीझन 2 साठी कायम ठेवण्याच्या सूचनेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. नवीन हा आयएलटी-20 च्या पहिल्या सत्रात शारजाह वॉरियर्ससाठी खेळला, ज्याने त्याला खेळाडूंच्या कराराच्या अटींनुसार या वर्षाच्या सुरुवातीला कायम ठेवण्याची नोटीस पाठवली होती.


शिस्तपालन समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट, सुरक्षा आणि भ्रष्टाचार विरोधी प्रमुख कर्नल आझम आणि अमीरात क्रिकेट बोर्डाचे सदस्य झायेद अब्बास यांचा समावेश होता. 


आयएलटीचे सीईओ म्हणतात...


आम्हाला अभिमान वाटत नाही परंतु सर्व खेळाडूंनी त्यांच्या करारांचे पालन करणं आणि त्यांनी इतर फँचायझीचं अन्यायकारक नुकसान केलंय, हे मान्य करणं अपेक्षित आहे. नवीन उल हक शारजाह वॉरियर्ससह त्याच्या कराराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरला आणि यामुळे लीगने त्याच्यावर 20 महिन्यांची बंदी घातली आहे. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असंही आयएलटीचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी म्हटलं आहे.


आणखी वाचा - IPL 2024 : अजून वेळ गेली नाही! रोहित शर्मा 'या' नियमानुसार सोडू शकतो मुंबई इंडियन्स


दरम्यान, नवीन उल हक इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) लखनऊ सुपर जायंट्सकडून (LSG) खेळतो. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीसोबत नवीनचा मोठा वाद झाला होता. त्यानंतर वर्ल्ड कपपूर्वी नवीनने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.