Naveen ul Haq Brutally Mocks Virat Kohli:  इंडियन प्रिमिअर लिगमधील यंदाच्या पर्वातील साखळी फेरीमधील शेवटच्या सामन्यात पराभूत झाल्याने बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा संघ स्पर्धेबाहेर पडला (RCB Elimination from IPL 2023). गुजरात जायंट्सने बंगळुरुला (GT vs RCB) पराभूत केल्याने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार शतक ठोकल्यानंतरही आरसीबीचा पराभव झाल्याने नवीन-उल-हकने (Naveen ul Haq) त्यांना ट्रोल केलं आहे. पराभवाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम नवीन-उल-हकच्या एका कृतीने केलं आहे. गुजरातने आरसीबीला 6 विकेट्स राखून पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानच्या या खेळाडूने एक इन्स्ताग्राम स्टोरी पोस्ट केली आहे.


वादाची पार्श्वभूमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या पर्वामध्ये विराट आणि नवीनमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यादरम्यान झालेल्या वादानंतर अनेकदा नवीनने खोचकपणे विराटला टार्गेट केलं. कधी मैदानात नडला तर कधी आरसीबीच्या पराभवानंतर आंबे खातानाचा फोटो पोस्ट करत नवीनने आरसीबीविरुद्धची टोलेबाजी सुरु ठेवली. यामुळे कोलकाता आणि लखनऊमध्ये नवीनला भारतीय चाहत्यांनी 'कोहली कोहली'ची घोषणाबाजी करुन ट्रोलही केलं. आरसीबी विरुद्ध लखनऊ सामन्यादरम्यान एकमेकांबरोबर बाचाबाची झाल्यानंतर विराट आणि नवीन परस्पर विरोधी संघांबद्दल सोशल मीडियावरुन अप्रत्यक्षपणे भाष्य करताना दिसत आहे. याच सामन्यात विराट आणि लखनऊचा मेन्टॉर असलेल्या गौतम गंभीरमध्येही मैदानाताच बाचाबाची झाली होती. यानंतर बीसीसीआयने विराट, गंभीर आणि नवीनला दंड ठोठावला होता. त्यानंतर विराट आणि नवीन एकमेकांच्या संघांविरोधात सूचक पोस्ट करत होते. मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामन्यात आरसीबीचा पराभव झाल्यानंतर नवीनने आंब्यांचे फोटो पोस्ट केले होते.


मर्यादा ओलांडली, चाहते संतापले


मात्र आता पुन्हा एकदा नवीनने आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर इन्स्ताग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. नवीनने एका हसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. इन्स्ताग्रामवर त्याने स्टोरी शेअर केली असून यामध्ये एक व्यक्ती हसत हसत टाळ्या वाजवताना दिसत आहे. अनेकांनी नवीनने केलेली ही कृती चुकीची असल्याचं म्हटलं आहे. बऱ्याच भारतीय चाहत्यांनी नवीनने सर्व मर्यादा ओलांडल्याचं म्हटलं आहे. बऱ्याच चाहत्यांनी विराटच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतानाच नवीन त्याची थट्टा उडवत असल्याचं नमूद करत या तरुण खेळाडूने जरा धीराने घेतलं पाहिजे असा खोचक सल्लाही दिला.


1) मर्यादा ओलांडली



2) याने वाद फारच लांबवला...



3) मालिकेत काम कर




आता पहिल्या स्थानावर असणारे 2 संघ म्हणजेच गुजरात आणि चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांविरोधात खेळतील. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असणारे संघ एकमेकांविरोधात खेळताना दिसणार आहे. एलिमिनेटरमध्ये नवीनचा समावेश असलेला लखनऊचा संघ मुंबईविरुद्ध खेळणार आहे. तर गुजरात आणि चेन्नईमध्ये क्वालिफायर-1 चा सामना होणार आहे.