मुंबई: आयपीएल 2022 चा पंधरावा हंगाम सुरु आहे. जवळपास 21 सामने झाले आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता बायो बबलचे नियम कठोर ठेवण्यात आले आहेत. मुंबई, पुणे दोनच शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन कॉन्स्टेबलने बायो बबलचे नियम मोडण्याचा प्रयत्न केला. दोन पोलीस कॉन्स्टेबल मद्यधुंद अवस्थेमध्ये बायोबबलमध्ये घुसले आणि त्यांनी खेळाडूंसोबत फोटो काढण्याचे प्रयत्न केले. ही धक्कादायक घटना गुजारात विरुद्ध हैदराबाद सामन्या दरम्यान ही घटना घडली आहे.


दोन पोलीस डी वाय पाटील स्टेडियमजवळ ड्युटीवर तैनात होते. गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्यासाठी त्यांना ड्युटी लावण्यात आली होती. त्याचवेळी हा प्रकार घडला. दोन्ही पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. 


IPL मध्ये तयार करण्यात आलेल्या बायो बबलच्या नियमानुसार खेळाडू, कॉमेंट्री करणारे आणि ब्रॉकास्टर्स एवढ्यांनाच तिथे परवानगी असते. याशिवाय तिसरा कोणताही व्यक्ती या बायो बबलमध्ये येऊ शकत नाही. या लोकांना बाहेरच्या कोणालाही भेटण्याची परवानगी नसते.