नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीपटू नवज्योत कौरने शुक्रवारी आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. नवज्योतने ६५ किलो वजनी गटात जपानच्या मिया इमाईला ९-१ असे हरवत सुवर्णपदकाची कमाई केली. नवज्योत आणि मिया यांच्यातील फायनल मुकाबला किर्गिस्तानच्या बिश्केक येथे खेळवण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, शुक्रवारी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची कमाई झाली. रिओ ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. 


साक्षीने ६२ किलो फ्रीस्टाईलमध्ये कझाकिस्तानच्या अयोलम केसीमोवाला १०-७ असे हरवले. या दोन पदकांसह या स्पर्धेत भारताच्या खात्यात ६ पदके झालीय. यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि ४ कांस्यपदकांचा समावेश आहे. 


नवज्योत कौरने आशियाई  कुस्ती स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये मंगोलियाची कुस्तीपटू सेवेजमेड एनख्बायरला २-१ असे हरवले होते. शुक्रवारी झालेल्या फायनलमध्ये नवज्योतने दमदार कामगिरी झाल्याने सामना एकतर्फी झाला.