नवी दिल्ली : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या चर्चेत आहे. आपल्या संघाला भारताविरुद्ध विजय मिळवून देणारा बाबर हा पाकिस्तानचा पहिला कर्णधार आहे. पण बाबर जितका त्याच्या खेळामुळे चर्चेत राहतो तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांच्या एका जुन्या मैत्रिणीने बाबर आझमवर अनेक आरोप केलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबरवर लैंगिक शोषणाचा आरोप


बाबर आझमची जुनी मैत्रीण हमीजा मुख्तारने एका पाकिस्तानी दैनिकाला सांगितले की, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने जवळपास 10 वर्षे तिचे लैंगिक शोषण केले. हमेजाने सांगितले की बाबरने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन 10 वर्षे तिचे लैंगिक शोषण केले आणि नंतर सोडून दिले. याशिवाय हमेजाने बाबरवर अनेक मोठे आरोप केले आहेत.


गर्भपात करावा लागला


याशिवाय बाबरच्या मैत्रिणीने पुढे म्हटले की ती देखील त्याच्या मुलाची आई होणार होती परंतु तिला नंतर तिच्या मुलाची हत्या करावी लागली. ती म्हणाला, 'माझ्या हातात पवित्र कुराण आहे आणि मी त्यावर हात ठेवून सांगते की बाबर आझमबद्दल मी जे काही बोलली ते अगदी खरे आहे. मी इथे खोटे बोलून वाचेन, पण अल्लाह पाकपासून मी कधीच सुटू शकणार नाही.'


20 लाख देऊन तोंड बंद करण्याचा प्रयत्न


हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले आहे. मात्र बाबर आझमने हमीजाकला 20 लाख रुपये घेऊन तोंड बंद ठेवण्यास सांगितले होते. बाबर सतत तोंड बंद ठेवण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप तिने केला आहे.


बाबर आझम भारताविरुद्ध विश्वचषकातील सामना जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे. 29 वर्षानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप मॅच हरली. महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान भारताला कधीही हरवू शकला नाही. पण विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला ज्याला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. वनडे असो की टी-20 विश्वचषक, पाकिस्तानने नेहमीच भारताला हरवण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आता ते स्वप्नही पूर्ण झाले आहे.