मुंबई : टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) टीम इंडिया न्यूझीलंड (New Zealand Tour 2021) विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया (Team India) न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने (Bcci) 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. या मालिकेत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (India v New Zealand Test Series 2021 BCCI Excludes Suryakumar Yadav from Indian Cricket Team) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरु होण्याआधीच करियर संपलं 


न्यूझीलंड विरुद्धच्या या कसोटी मालिककेसाठी मुंबईकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी देण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या ठिकाणी मुंबईकर असलेल्या सूर्यकुमार यादवला मात्र डच्चू मिळाला आहे.


सूर्यकुमारला नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं होतं. सूर्या टी 20 आणि वनडेनंतर कसोटीत खेळताना दिसेल, अशी सर्व चाहत्यांना आशा होती. मात्र तसं काहीच झालं नाही. सूर्याला या कसोटी मालिकेतही संधी मिळाली नाही.


सूर्याचा संघर्ष


सूर्या गेल्या काही दिवसांपासून आऊट फॉर्म आहे. त्याला त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्यात आणि त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.


तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त असल्याने तो संघाबाहेर होता. मात्र तो आता फिट झाल्याने त्याला कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.   


न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (रिझर्व्ह विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्द कृष्णा.


टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड टीम | केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेवेन कॉनवे, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), हेनरी निकोल्स, रॉस टेलर, विल यंग, रचिन रविंद्र, टीम साउदी, कायले जेमीन्सन, नील वॅगनर, मिचेल सँटनर, ऐजाज पटेल, विल समरविल आणि ग्लेन फिलिप्स.


कसोटी मालिकेचे वेळापत्रक


पहिली कसोटी, 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर.  


दुसरी कसोटी, 3 ते 9 डिसेंबर, मुंबई.