Diamond League : Neeraj Chopra ला `डायमंड` जिंकण्यात अपयश, रौप्यपदकाला गवसणी
Diamond League Final 2023 : नीरज चोप्राने गेल्या महिन्यात पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता. डायमंड लीगमध्ये तो जिंकला असता तर तो तिसरा खेळाडू ठरला असता, पण तसं घडलं नाही.
Diamond League Final 2023 : ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा नीरज चोप्रा इतिहास रचण्यात हुकला. डायमंड लीग फायनलमध्ये नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर अंतर फेकलं. मात्र प्राजसत्ताकच्या जाकुब वादलेचने 84.24 मीटर अंतरावर भाला फेकून डायमंड लिग स्पर्धेवर आपलं नाव कोरलं. तर फिनलंडच्या ऑलिव्हर हेलँडरनं 83.74 मीटर भालाफेक करत तिसरा नंबर पटकावला.
खरं ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राने जशी कामगिरी दाखवली तसा फॉर्म नीरजचा डायमंड लीगच्या फायनलमध्ये दिसला नाही. पहिल्या दोन प्रयत्नात त्याला स्कोअर करता आला नाही. त्यानंतरच्या 4 प्रयत्नांमध्ये 83.80 मीटरचं अंतर त्याने पार केलं खरं पण सुवर्णपदक त्याचा हातातून निसटलं.
अंतिम फेरीतील सर्व खेळाडूंचा सर्वोत्कृष्ट स्कोअर
1. जेकब वडलेच (झेक प्रजासत्ताक) - 84.24 मीटर
2. नीरज चोप्रा (भारत) - 83.80 मीटर
3. ऑलिव्हर हेलँडर (फिनलंड) - 83.74 मीटर
4. आंद्रियन मार्डरे (मोल्दोव्हा) - 891
मीटर कर्टिस थॉम्पसन (यूएसए) - 77.01 मी
6. अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) - 74.71 मी
खरं तर नीरज चोप्राने डायमंड लीगवर आपलं नाव कोरलं असतं तर तो जगातील तिसरा भालाफेकपटू ठरला असता, ही संधी हुकली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नीरज चोप्रानं ज्युरिखमध्ये डायमंड लीगची अंतिम फेरीत यश मिळवलं होतं. पुन्हा तोच चमत्कार दाखवणे नीरजला जमलं नाही.