अमेरिका : ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेतील युजीनमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याने 88.13 मीटर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदकावर नाव कोरलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने सिल्वर मेडलची कमाई केली आहे. अवघ्या काही पॉईंट्सने त्याचं सुवर्ण पदक हुकलं आहे. संपूर्ण भारताची त्याच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. मात्र नीरजला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं आहे.


नीरजचा फालाफेक


  • नीरजचा पहिला थ्रो- फाऊल

  • नीरजचा दुसरा थ्रो- 82.39 मीटर

  • नीरजचा तिसरा थ्रो- 86.37 मीटर

  • नीरजचा चौथा थ्रो- 88.13 मीटर

  • नीरजचा पाचवा आणि सहावा थ्रो- फाऊल


नीरजचा अँडरसनशी सामना 


जागतिक क्रमांक-1 भालाफेकपटू अँडरसनने पात्रता फेरीत 89.91 मीटर अंतरावरून भालाफेक करून अंतिम फेरी गाठली. तो क्रमवारीत पहिला होता तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नीरजने पात्रता फेरीत 88.39 मीटर अंतरावर भालाफेक केली. अशा परिस्थितीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नीरजला या अंतिम फेरीत अँडरसनला हरवण्यासाठी 90 मीटर अंतरावर भालाफेक करावी लागणार होती, मात्र ते शक्य झालं नाही.