Umran Malik : येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघ यावेळी T20 वर्ल्डकपसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. टीम इंडियाकडे (Team India) 15 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकण्याची संधी असल्याने टीम इंडिया कसून तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

T20 World Cup पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे संघाबाहेर पडला. त्याच्याजागी आता मोहम्मद शमी (Mohammed Shami) किंवा दीपक चहरला (Deepak Chahar) संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, टीम इंडियाच्या सिलेक्शनवर वर्ल्ड क्रिकेटमधील काही माजी खेळाडू नाराज असल्याचं पहायला मिळत आहे.


भारताचा फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) याला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे जगातील महान गोलंदाजांपैकी एक असलेल्या ब्रेट लीने (Brett Lee) निराशा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर उमरानला मदत मिळाली असती, असं ब्रेट लीचं मत आहे.


काय म्हणाला Brett Lee - 


भारतीय निवड समितीच्या या निर्णयाने ब्रेट लीला धक्का बसला आहे. ब्रेट ली म्हणतो की, ऑस्ट्रेलियन परिस्थितीत उमरान हा एक चांगला पर्याय असू शकतो. या वेगवान गोलंदाजाला वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर (Australian  pitch) पाहणं हा भारतासाठी विजयाचा क्षण राहिला असता, असं ब्रेट ली म्हणाला आहे.


दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर शमीने 2015 च्या वर्ल्ड कपला कमाल केली होती. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर उमरान मलिक कमाल करू शकतो, उमरानच्या फास्ट बॉलिंगचा सामना करणं कोणत्याही खेळाडूला सोपं राहणार नाही.