Indian Cricket Team : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाचे युवा खेळाडू खेळणार आहेत. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2024) ही मालिका रोहितसेनेसाठी लिटमस टेस्ट असेल. बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) धडाकेबाज निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच टीम इंडियाचा म्होरक्या (Captain of Team India) असेल, यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालंय. 
 
टीम इंडियाचा स्टार कॅप्टन रोहित शर्माने मागील टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपासून एकही आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना खेळला नाही. त्यामुळे  त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अशातच आता अफगाणिस्तानविरुद्ध रोहित आणि विराटने कमबॅक करत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघात आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलंय. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांना दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं असलं तरी रोहित शर्माच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार आयपीएलनंतर म्हणजेच 1 जूनपासून सुरू होईल. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळली जाणार आहे. या वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाकडे फक्त एक टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका शिल्लक आहे. टी20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर स्पर्धेतला दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 9 जूनला (India vs Pakistan) खेळवला जाणार आहे. तिसरा सामना 12 जूनला यजमान अमेरिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. हे तीनही सामने न्यूयॉर्कमधले खेळवले जाणार आहेत. 


अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.