T20 World Cup, Sandeep Lamichhane: आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने (Joshua Little) वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅट्ट्रिक साजरी केली आणि नवा विक्रम नावावर केला आहे. लिटलने नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछानेचा एका वर्षात सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट (Highest Wicket In T20 Cricket) घेण्याचा विश्वविक्रम मोडीस काढलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इकडं T20 World Cup 2022 मध्ये नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछानेचा (Sandeep Lamichhane) वर्ल्ड रेकॉर्ड मोडला (World Record) अन् तिकडं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात संदीपला 6 ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा अंतिम निकाल येईपर्यंत काठमांडू जिल्हा न्यायालयाने संदीप लामिछानेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


आरोपी लामिछाने यानं 21 ऑगस्टच्या रात्री  17 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.  जिल्हा न्यायालयाने 7 सप्टेंबर रोजी लामिछाने याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. मात्र, त्यानंतर महिनाभर लामिछानेला अटक करण्यात आली नव्हती. नंतर त्याने स्वतः शरण येण्याचा निर्णय घेतला.


काय आहेत आरोप - 


संदीप लामिछाने एका 17 वर्षाच्या मुलीला काठमांडू आणि भक्तीपूरमध्ये घेऊन गेला. त्यावेळी त्यानं  काठमांडूतील सिनामंगल येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर प्रकरण आणखीन चिघळल्यानंतर संदीपला नेपाळ क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. यावेळी लामिछाने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. या लीगमध्येही तो त्याच्या संघातून बाहेर काढण्यात आलंय.


आणखी वाचा - Karnataka Leopard : किंकाळ्या, पळापळ आणि...; पिसाळलेल्या बिबट्याला पाहून नागरिक सैरभैर!


दरम्यान, या प्रकरणानंतर सोशल मीडियावर (Social Media) जोरदार टीका सुरू झाली. त्यावेळी तो परदेशात होता. वारं आपल्या विरोधात असल्याचं पाहून त्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. कतार एअरवेजने थेट राजधानी काठमांडू गाठलं. येथं पोलिसांनी त्याला विमानतळावरूनच अटक केली आणि तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यानंतर आता त्याला न्यायालिय कोठडी सुनावल्यात आली.