Crime News : आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळलेल्या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नेपाळी खेळाडू असून आता तो केनियाविरूद्धच्या दौऱ्यावर आहे. आपल्या कामगिरीने छाप सोडणाऱ्या कर्णधारावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने असं खेळाडूचं नाव आहे. एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप सध्या केनियाच्या दौऱ्यावर आहे.


कोण आहे संदीप लामिछाने? 
आयपीएलमध्ये नेपाळकडून खेळणारा संदीप लामिछाने हा पहिला खेळाडू आहे. 2018 मध्ये त्याला दिल्ली संघाने त्याला खरेदी केलं होतं. त्यावेळी संदीपचं वय हे 17 वर्षे इतकं होतं. 20 लाखांना दिल्ली संघाने आपल्या ताफ्यामध्ये सामील केलं होतं. 17 वर्षाच्या पोराला संघाने आयपीएलमध्ये घेतल्यावर त्यावेळी संदीप चर्चेत आला होता. 


संदीप हा लेग स्पिनर असून त्याने 2016 च्या अंडर-19  विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यावेळी नेपाळचा संघ आठव्या स्थानावर राहिला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायरल क्लार्कसुद्धी संदीपच्या कामगिरीने प्रभावित झाला होता. 


संदीप केनियाविरूद्धच्या दौऱ्यात खेळत असून संघाच्या नेतृत्त्वाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. मात्र आता बलात्काराच्या गुन्ह्यामुळे त्याचं करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे.