मुंबई : टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) गुरुवारी 16 सप्टेंबर मोठी घोषणा केली. विराटने टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद (Captaincy) सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता वर्ल्ड कपनंतर नेतृत्वाची धुरा ही रोहित शर्माला (Rohit Sharma) मिळणार असल्याचं म्हंटलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटचा हा निर्णय केएल राहुलच्या (K L Rahul) पथ्यावर पडणार असल्याचं म्हंटलं जातंय. आता तुम्ही म्हणाल, इथे विराट-रोहित शर्मामध्ये केएल राहुल कुठून आला. पण इथेच खरा गेम आहे. कसं ते जाणून घेऊयात. (Netizens demand KL Rahul to be vice captain after Virat Kohli steps down as T20 captain)


सध्या विराट कोहली टेस्ट आणि वनडेसह टी 20 टीमची कॅप्टन्सी करतोय. तर रोहित शर्मा वनडे आणि टी 20 संघाचा उपकर्णधार आहे. विराट टी 20 संघाचं वर्ल्ड कपपर्यंत नेतृत्व करणार आहे. त्यानंतर नियमांनुसार उपकर्णधार असलेला रोहितला नेतृत्वाची संधी मिळू शकते. त्यामुळे उपकर्णधारपदाची जागा रिकामी होईल.


टीममध्ये केएल राहुल हा अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तसेच केएल हा आयपीएलमध्ये ओपनिगं, विकेटकीपिंग आणि कॅप्टनशीप अशा तिहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडतोय. 


केएलला नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. तसेच तो तिहेरी भूमिकांची जबाबदारी सार्थपणे पार पाडतोय. सध्या तो चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे केएलला भारताच्या टी 20 संघाचं उपकर्णधार करावं. तो या पदासाठी प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे केएललाच उपकर्णधार करावा, असा सूर आवळला जातोय.


राहुलची टी 20 कारकिर्द


केएल राहुलने आतापर्यंत टीम इंडियाकडून 49 टी 2 सामने खेळला आहे. केएलने या 49 सामन्यात 39.9 च्या एव्हरेजने आणि 142.2 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 557 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 12 अर्धशतकांचाही समावेश आहे. त्यामुळे  केएलकेडे फारसा अनुभव नसला तरी पुरेसा अनुभव निश्चितच आहे. त्यामुळे आता विराटचा निर्णय केएलच्या पथ्यावर पडणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.