नवी दिल्ली : शमी आणि हसीनच्या वादात आता नवीन गोष्ट समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमी आणि हसीन यांचा वाद आता वाढतच चालला आहे. हसीन रोज पत्रकार परिषद घेऊन शमीवर नवेनवे आरोप करत आहे. हसीनच्या आरोपांवर शमी काहीही बोलत नाहीये. हसीन कोणाच्या तरी सांगण्यावरुन हे करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 


आतापर्यंत या वादात एक पाकिस्तानी मुलगी होती पण आता एका नव्या मुलाची या वादात एन्ट्री झाली आहे. हसीन एका मुलाच्या संपर्कात आहे आणि तोच तिला भडकवत असल्याचं बोललं जातंय. हसीन ही शमीकडून मागील २ महिन्यांपासून ५० कोटींची मागणी करत असल्याचं देखील बोललं जातंय. 


शनिवारी शमीवर एफआयआर देखील दाखल झाला आहे. शमीवर आयपीसीच्या 498 A, 323, 307, 376, 506, 328, 34 या कलमांअतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. देशासाठी खेळणारा शमी सध्या क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. शमीला याचा मोठा फटका त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये बसणार आहे.