दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा, `हा` खेळाडू सांभाळणार टीमची जबाबदारी
IPL 2024 Delhi Capitals New Captain: 2023 साठी डेव्हिड वॉर्नरने दिल्लीच्या टीमची धुरा सांभाळली होती. डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा अपघात झाला होता. यामध्ये पंत गंभीर जखमी झाल्याने तो 2023 मध्ये आयपीएल खेळू शकला नाही.
IPL 2024 Delhi Capitals New Captain: येत्या शुक्रवारपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यावेळी सर्व खेळाडूंनी प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. यावेळी आयपीएलच्या काही टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यापैकी एक टीम म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. दिल्लीने नुकतंच त्यांच्या कर्णधारपदाबाबत मोठी घोषणा केली आहे. यावेळी दिल्लीने नव्या सिझनसाठी नवा कर्णधार असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा
2023 साठी डेव्हिड वॉर्नरने दिल्लीच्या टीमची धुरा सांभाळली होती. डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा अपघात झाला होता. यामध्ये पंत गंभीर जखमी झाल्याने तो 2023 मध्ये आयपीएल खेळू शकला नाही. त्यामुळे पंतच्या जागी वॉर्नरला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा ऋषभ पंत कर्णधार म्हणून कमबॅक करताना दिसणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केलं प्रेस रिलीज
दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष आणि सहमालक पार्थ जिंदाल यांनी यासंदर्भात एक प्रेस रिलीज जाहीर केलं आहे. या प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय की, ऋषभ पंतचं कर्णधार म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. त्याचा क्रिकेटमधील निर्भयपणा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. आम्ही नव्या जोमाने आणि उत्साहाने नव्या सिझनची वाट पाहत आहोत. पंत पुन्हा एकदा मैदानावर आमच्या टीमचं नेतृत्व करताना पाहण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही.
14 महिन्यांनंतर मैदानावर परतणार
बीसीसीआयने (BCCI) काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतबाबत (Rishabh Pant) मोठी अपडेट दिली होती. 30 डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतवर रिहॅब सेंटरमध्ये उपचार सुरु होते. आता 14 महिन्यांतर ऋषभ पंत पूर्णपणे तंदरुस्त झाला असून आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
आयपीएल 2024 साठी कशी आहे दिल्लीची टीम
ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्खिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यशू शर्मा, डी. मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.