मुंबई :  'न्यू इंग्लंड पेट्रिएट्स अमेरिकन' ही  सगळ्यात यशस्वी फूटबॉल टीम समजली जाते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टीमने आपल्या खेळाडूंसाठी 2 बोईंग विमानांची खरेदी केली आहे. 767 बोईंग वाईड बॉडी  जेट्समच्या खरेदीमुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. 


विकत घेतलेल्या बोईंग विमानाची किंमत सुमारे 200 मिलियन डॉलर म्हणणेच सुमारे 1277 करोड इतकी आहे. टीमच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात सार्‍या सीट्स फर्स्ट क्लास प्रमाणे आहेत. तसेच हे विमान सलग 12 तास हवेत उडू शकते. 


बॅकअपसाठी एक खास विमान  


 दोन विमानांपैकी एकाचा वापर फूटबॉल सीझन दरम्यान करण्यात येईल तर दुसरे विमान बॅकअप म्हणून ठेवण्यात येईल. काही वेळेस लांबचा प्रवास खेळाडूंना थकवणारा असतो.  हा त्रास  टाळण्यासाठी टीम ने हा निर्णय घेतल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले आहे. 
 
खास ठरणार ही बोईंग विमानं - 
 


  •   'न्यू इंग्लंड पेट्रिएट्स अमेरिकन'  ही टीम सुमारे 5 वेळेस  सुपर  बॉल चॅम्पियन ठरली आहे.  त्यामुळे विमानावरही टीमचा लोगो आणि सुपर बॉल ट्रॉफी असेल. 

  •   ऑफ सिझन आणि टीमला गरज नसल्यास ही खास विमानं भाड्यानं दिली जातील.  


  
                         अनेकदा मॅच खेळण्यासाठी बोईंग  विमानाने प्रवास केला जातो. यामुळे 31 करोड ते 415 करोड रूपयांचा  खर्च होतो. पण हा खर्च  प्रवास कुठून  कुठपर्यंत आहे यावरही अवलंबून असते.