मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) T20 क्रिकेटला अधिक आकर्षक, गतिमान आणि मनोरंजक बनवण्यासाठी 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम लागू करणार आहे. या नियमाच्या मदतीने, फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉलसारख्या खेळांप्रमाणेच टीम मधल्या सामन्यात खेळाडू बदलू शकणार आहे. बीसीसीआयने हा नियम सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतलाय. ही चाचणी यशस्वी झाली तर येत्या काळात आयपीएलमध्येही त्याचा वापर होताना दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा नियम 2005 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटमध्ये लागू करण्यात आला होता. ICC ने 2005 साली क्रिकेटमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वर्षभरातच हा नियम काढून टाकण्यात आला. आता बीसीसीआय त्याचा देशांतर्गत स्पर्धांमध्ये वापर करून आयपीएलमध्येही आणण्याचा विचार करत आहे. या नियमामुळे खेळ अधिक रंजक होऊ शकतो.


काय आहे 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम


या नियमानुसार, टॉसच्या वेळी, टीमना चार ऑप्शनसह त्यांचे प्लेइंग-11 घोषित करावं लागेल. टीमना या चार पर्यायांपैकी एकच पर्याय वापरता येईल. टीम सामन्याच्या 14 व्या ओव्हरपर्यंत पर्यायी खेळाडूला मैदानात पाठवू शकतात. यासाठी मैदानावर उपस्थित असलेल्या अंपायर किंवा चौथ्या अंपायरना ओव्हरच्या शेवटी माहिती द्यावी लागेल. 


कर्णधार/मुख्य प्रशिक्षक/टीम मॅनेजमेंट यांपैकी कोणीही अंपायरला हे सांगू शकतो. ज्या खेळाडूच्या जागी नवीन खेळाडू पाठवला जाईल, तो खेळाडू नंतर संपूर्ण सामन्यातून बाहेर राहील. म्हणजेच क्षेत्ररक्षण करतानाही तो दिसणार नाही.


यान नियमानुसार टीम मैदानात उपस्थित असलेल्या त्यांच्या खेळाडूंपैकी एकाला बेंचवर ठेवतील आणि त्याच्या जागी दुसरा खेळाडू घेतील. सामन्याच्या रणनीती आणि परिस्थितीनुसार टीम हे करतात. क्रिकेटमध्येही ते लवकरच पाहायला मिळणार आहे.