मुंबई : क्रिकेट जगतातील सचिन तेंडुलकर हे खूप मोठे नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालेल्यांपासून ते टीम इंडियामध्ये आलेल्या सर्व क्रिकेटर्सना सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी फारच उत्सुकता असते. सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सचिन बरोबरच्या त्याच्या पहिल्या भेटीच्या वेळी, त्याच्या समोर नतमस्तक झाला होता. सौरव गांगुली, युवराज सिंग, रोहित शर्मा आणि विराट कोहली या सगळ्यांचीच सचिन बरोबरची पहिली भेट खूपच स्पेशल होती. सुरेश रैनाही जेव्हा सचिनला भेटला तेव्हा तो त्याच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत सुरेश रैनाने सचिन तेंडुलकर सोबत झालेल्या आपल्या पहिल्या भेटी दरम्याच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. मुलाखतीत सचिनबरोबर झालेल्या पहिल्या भेटीबद्दल रैना म्हणाला, "मला अजूनही आठवतंय. सेंट रेज मफतलाल सोबत सामना होता. त्या सामन्यात मी 200 धावा केल्या होत्या. त्यावेळी अतुल रानडे भाई मला भेटले. त्यांनी मला सांगितले की, सचिन पाजी उद्या प्रॅक्टिस करायला येणार आहे. मी उद्या तुझी त्यांच्याशी भेट घालून देईन. "



त्यानंतर सुरेश रैना म्हणाला, "ही गोष्ट ऐकूण मी संपूर्ण रात्र झोपलो नाही. जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा सचिन CCI च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यासाठी सराव करत होते. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, तू चांगली फलंदाजी करत आहेस. मग मी त्यांना थँक्यू पाजी असे उत्तर दिले."


रैना म्हणाला. "यूपी वरुन येऊन सचिन पाजींना पहिल्यांदा भेटणे हे माझ्यासाठी खूप विशेष होतं. इतका मोठा खेळाडू असूनही त्यांनी ज्या पद्धतीने माझी प्रशंसा केली, त्यांनी माझ्या हातात हात घेतला. येथे त्यांचा मनाचा मोठेपणा दिसतो. त्यादिवशी त्यांनी मला शिकवले की, क्रिकेट इतकाच तुमचा स्वभाव आणि तुमची संस्कृती खूप महत्वाची आहे. त्यांचे बोलणे ऐकल्यावर मग मी विचार करत राहिलो की, मी कशा प्रकारे भविष्यात खेळेण आणि माझे पुढचे आयुष्य कसे मॅनेज करेन?. "