मुंबई : पदार्पणातील सामन्यात चमकदार कामगिरी करावी, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. पण अशी स्वप्नवत कामगिरी करणं प्रत्येक खेळाडूला जमतच असं नाही. पण न्यूझीलंडच्या एका पठठ्याने इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत सिक्स ठोकत द्विशतक लगावलं आहे. न्यूझीलंडच्या डेवन कॉनवेचा (Devon Conway) हा डेब्यू सामना. या पदार्पणातील सामन्यात डेवनने सिक्स ठोकत द्विशतक लगावण्याचा कारनामा केला आहे. यासह त्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. (New Zealand Batsman Devon Conway Complete His double century with six in Test Debut agaisnt England)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात डेवनने पहिल्या डावात फलंदाजी करताना ही द्विशतकी खेळी केली आहे. डेवनने 345 चेंडूत 22 चौकार आणि 1 सिक्ससह 200 धावा केल्या. डेवन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणातील सामन्यामध्ये सिक्स ठोकत द्विशतक लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच मॅथ्यू सिनक्लेयर आणि ब्रॅंडन मॅक्युलमनंतर द्विशतक लगावणारा न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू ठरला आहे.  


डेब्यूमध्ये द्विशतक लगावणारा 7 वा क्रिकेटर


डेवन पदार्पणातील सामन्यात द्विशतक ठोकत विक्रमाला गवसणी घातली आहे. असा कारनामा करणारा तो क्रिकेट विश्वातील 7 वा तर न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे. डेवनला या सामन्यात टॉम ब्लनडेलच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. डेवनने या संधीचं सोनं केलं. तसेच त्याने टीम मॅनेजमेंटचा विश्वासही खरा ठरवला. 


डेवन इंग्लंडमध्ये पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलवा आहे. याआधी हा विक्रम वेस्टइंडिजच्या जॉर्ज हेडलीच्या नावे होता. हेडलीने 1930 मध्ये 176 रन्स केल्या होत्या. म्हणजेच डेवनने 91 वर्षांपूर्वींचा हा विक्रम मोडीत काढला आहे. कॉनवेने सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधर ग्रेम स्मिथ आहे. स्मिथने 2003 मध्ये 370 चेंडूत 259 धावांची खेळी केली होती.  


संबंधित बातम्या : 


WTC 2021 Final साठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचली, के एल राहुलकडून पहिला फोटो शेअर