WTC 2021 Final साठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचली, के एल राहुलकडून पहिला फोटो शेअर

टीम इंडियाचा स्टार फलंदाज के एल राहुलने आपल्या इन्स्टाग्रामवर लंडनच्या विमानतळावर पोहोचल्याचा फोटो शेअर केला आहे.

Updated: Jun 3, 2021, 04:10 PM IST
WTC 2021 Final साठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचली, के एल राहुलकडून पहिला फोटो शेअर title=

मुंबई: टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहेत. 18 ते 22 जून दरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळली जाणार आहे. टीम इंडिया लंडनमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडियातील स्टार फलंदाज के एल राहुलने विमानतळावरचा फोटो शेअर केला आहे. 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज के एल राहुलने आपल्या इन्स्टाग्रामवर लंडनच्या विमानतळावर पोहोचल्याचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियातील खेळाडूंसोबत त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंड यांना इंग्लंड दौऱ्यासाठी परवानगी मिळाली आहे. कर्णधार विराटसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वामिका देखील लंडनमध्ये दाखल झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KL Rahul(@rahulkl)

राहुलने शेअर केलेल्या या फोटोला 1 तासात 5 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लंडनहून साउथेम्प्टनला जाण्यासाठी दुसरी फ्लाइट पकडावी लागणार आहे. तिथे गेल्यानंतर सर्व खेळाडू आयसोलेशनमध्ये असणार आहेत. टीम इंडियाचे सर्व खेळाडू मुंबईमध्ये देखील आयसोलेशनमध्ये होते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी न्यूझीलंड संघ इंग्लंड विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळला जाणार आहे.