न्यूझीलंडला अलविदा करत हा दिग्गज खेळाडू आता या देशाकडून खेळणार
न्यूझीलंडला धक्का. हा दिग्गज खेळाडू दुसऱ्या देशाकडून खेळणार
मुंबई : न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू कोरी अँडरसनने न्यूझीलंड संघाची साथ सोडली आहे. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेगळ्या संघाकडून खेळणार आहे. कोरी अँडरसन आता अमेरिकेच्या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. 29 वर्षीय अँडरसनने वनडे क्रिकेटमधील दुसरे वेगवान शतक झळकावले आहे. अमेरिकेत होत असलेल्या मेजर लीग टी -20 क्रिकेटपासून तो त्याची सुरुवात करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आता अमेरिकेचे प्रतिनिधित्व करेल.
कोरी अँडरसनची होणारी पत्नीही अमेरिकन नागरिक आहे आणि तिचे नाव मेरी शामबर्गर आहे. कोरोनाव्हायरसमुळे तो तिच्यासोबतच टेक्सासमध्ये वेळ घालवत आहे.
अमेरिका सध्या वनडे टीमचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सक्रिय क्रिकेटर्सना ते समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. पाकिस्तानचा कसोटी क्रिकेटपटू सामी अस्लम आणि इंग्लंडचा विश्व चँपियन संघाचा कर्णधार लियाम प्लंकेट यांना देखील अमेरिके त्यांच्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या रस्टी थेरॉन आणि डेन पिएडट यांनी यापूर्वीच अमेरिकेतून खेळायचे ठरवले आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) मालकांनी लीगमध्ये गुंतवणूक जाहीर केल्याने मेजर लीग क्रिकेटला मंगळवारी मोठा दिलासा मिळाला. ही लीग 2022 पासून सुरू होऊ शकते.