कानपूर : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामन्या कालपासून सुरूवात झाली असून भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत दौऱ्यावर न्यूझीलंड संघाने नाणेफेक गमावण्याची ही सलग चौथी वेळ आहे. दरम्यान ही गोष्ट न्यूझीलंडच्या खेळाडूंना पचवता आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉसबाबत न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशमने मजेशीर ट्विट करत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. सलग टॉस हरल्यावर नीशमने ट्विट केलं आणि लिहिलं की, टॉसचं नाणं कोणी जवळून पाहू शकतं का?


विल्यमसनलाही टॉस जिंकता आला नाही


पहिला सामना कानपूरमध्ये खेळवला जात असून विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे टीम इंडियाचे नेतृत्व करतोय. तर कर्णधार केन विल्यमसन न्यूझीलंड संघात परतला आहे. हे सर्व बदल करूनही न्यूझीलंड संघाचे नशीब फारसं चांगलं दिसून आलं नाही कारण सलग चौथ्या सामन्यात किवी संघ टॉस हरला.


NZ टीमने T20मध्ये तिन्ही टॉस गमावले


या महिन्यात UAE मध्ये T20 वर्ल्डकप संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ थेट भारताच्या दौऱ्यावर आला होता. सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली गेली. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली. त्याचसोबत तिन्ही सामन्यात न्यूझीलंड टीमने टॉस गमावला.


पहिले दोन सामने गमावल्यानंतर किवी टीमने कर्णधार बदलला. गेल्या सामन्यात टीम साऊदीऐवजी मिचेल सँटनरकडे कमान सोपवण्यात आली होती. पण परिस्थिती बदलली नाही. टीमने टॉस आणि सामना दोन्ही गमावले होते.