ODI World Cup 2023 : क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाच्या वर्ल्ड कप (Cricket World Cup) सामन्यांचं बिगुल वाजलं आहे. डिफेन्डिंग फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. मागील वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला अन् सुपर ओव्हर देखील टाय झाल्याने इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं होतं. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात थरारक सामना मानला जातो. या सामन्यात नेमकं काय झालं होतं? सुपर ओव्हरमध्ये काय काय झालं? पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फंलादाजी करताना न्यूझीलंडने 241 धावांचं आव्हान उभं केलं होतं. मार्टिन गप्तील लवकर बाद झाल्यानंतर केन विलियम्सन आणि हेन्री निकोलस यांनी खेळ सांभाळला. मात्र, टॉम लिथम याने अखेरीस  आक्रमक खेळ करत न्यूझीलंडला 241 धावांवर पोहोचवलं. इंग्लंडच्या क्रिस वोक्सने 3 विकेट्स घेतल्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडला 242 धावांची गरज होती. इंग्लंडचा संघ गडगडला. जेसन रॉय, जो रूट यांसारखे फलंदाज झटपट बाद धाले. त्यानंतर जो रूट आणि जॉस बटलर यांनी इंग्लंडला सावरलं. इंग्लंडला अखेरच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती. मात्र, इंग्लंडला 6 बॉलमध्ये 14 धावा करता आल्या. सामन्यात सुपर ओव्हर झाली. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये 15 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडला देखील 15 धावाच करता आल्या. त्यानंतर इंग्लंडने जास्त फोर मारल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.


पाहा सामन्याच्या Highlights 



दरम्यान, वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी आता न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात केन विलयम्सन खेळणार नसल्याचं समोर आलंय. त्याच्या जागी टॉम लाथम कॅप्टन्सी करेल. 


वर्ल्ड कप 2023 साठी संघ


इंग्लंड : जॉस बटलर (कॅप्टन), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सॅम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेव्हिड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स


न्यूझीलंड : केन विलियमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउदी, विल यंग.