Viral Video: `चीते जैसे तेजी... बाज-सी नजर`, फिल्डर बनला सुपरमॅन; असा झेल घेतला की सगळेच बघतच बसले
NZ vs ENG 1st Test: तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने हवेत मोठी झेप घेत एक अप्रतिम झेल घेतला.
Glenn Phillips: तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने एक अप्रतिम झेल घेतला. ग्लेन फिलिप्सच्या या झेलचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ग्लेन फिलिप्स हा बिबट्यासारखा वेगवान धावत आणि त्याने हवेत उडत असताना आश्चर्यकारकपणे आपल्या शिकारीला पकडले. हा झेल घेऊन ग्लेन फिलिप्सने क्रिकेट जगताला आपले फॅन बनवले आहे.
हवेत उडत घेतला अप्रतिम झेल
हा अप्रतिम झेल इंग्लंडच्या पहिल्या डावातील 53 व्या षटकात घेतला गेला. इंग्लंडचे फलंदाज हॅरी ब्रूक आणि ओली पोप यांनी पाचव्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडचे गोलंदाज विकेट्ससाठी खूप वेळापासून वाट बघत होता. ५३व्या षटकात असा चमत्कार घडला की न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.५३व्या षटकात न्यूझीलंडचा कर्णधाराने गोलंदाज टिम साऊदीकडे चेंडू सोपवला. टीम साऊदीने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऑली पोपला ७७ धावांवर बाद केले.
हे ही वाचा: Video: सामन्यादरम्यान 35 वर्षीय क्रिकेटरचा अचानक मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
बघा व्हायरल व्हिडीओ
हे ही वाचा: लिलावात अनसोल्ड राहणं जिव्हारी लागलं, 'या' भारतीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय; क्रिकेट विश्वात खळबळ
क्रिकेट जगतात झेलची चर्चा
टीम साऊदीने घेतलेल्या विकेट्सने इंग्लंडची पाचव्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारीही तुटली. टीम साऊदीला ही विकेट फक्त एकाच व्यक्तीमुळे मिळाली आणि ती म्हणजे ग्लेन फिलिप्स. 53 व्या षटकात, ऑली पोपने टिम साउथीचा दुसरा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्लेन फिलिप्सने हवेत उंच उडी मारत एक आश्चर्यकारक झेल घेतला. ग्लेन फिलिप्सने उडी मारून अशक्य झेल घेतला आणि सगळे बगतच बसले. ओली पोपला ७७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. ग्लेन फिलिप्सच्या या झेलचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला आहे.